Who is Bhagyashree Jagtap NCP candidate from Lonavala : घराणेशाही राबवणाऱ्यांचं राजकारण तुम्ही पाहिलयं... मात्र अजितदादांनी एका फळ विकणाऱ्या महिलेला नगरपरिषदेची उमेदवारी दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलंय... ही उमेदवारी नेमकी कोणाला मिळाली? राजकारणाचं हे आव्हानं सर्वसामान्य घरातील उमेदवार कसे पेलणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
राज्यात नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे... एकाच घरात सहा उमेदवार देऊन घराणेशाहीचं राजकारण होतं असताना दुसरीकडे लोणावळा नगरपरिषदेत घराणेशाहीच्या या गढूळ राजकारणात एक सकारात्मक चित्र पाहायाला मिळतयं... अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं फळविक्रेत्या असणाऱ्या भाग्यश्री जगताप यांना नगरपरिषदेची उमेदवारी दिलीय... त्यामुळे सकाळी फळविक्री आणि संध्याकाळी निवडणुकीचा प्रचार असा भाग्यश्री यांचा दिनक्रम झालाय... मतदारांच्या समस्या सोडवण्याचं व्हिजनही त्यांनी हाती घेतलयं...
राजकारणाच्या बाजारात उमेदवारांना तिकीट मिळवण्यापासून ते मतं मिळवण्यापर्यंत अनेक आव्हानांना समोरे जावं लागतं....मात्र सामान्य भाजीवाल्या भाग्यश्री जगतापांवर पक्षानं विश्वास दाखवला असला तरी मतदार त्यांना जनसेवेची संधी देणार का? याबाबत उत्सुकता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.