Mumbai Metro  
मुंबई/पुणे

Mumbai Metro: मतदारांना विशेष सवलत; मतदानाच्या दिवशी मेट्रो तिकिटावर मिळणार १० टक्के सूट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(संजय गडदे)

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा २० मे रोजी पार पडणार आहे. या टप्प्यात मुंबईत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. गेल्या दोन मतदानाची टक्केवारी बघता या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढवी, यासाठी निवडणूक आयोग मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहे. याच पार्श्वभूमीवर महामुंबई मेट्रोने मतदानाच्या दिवसासाठी विशेष सवलत दिलीय. तिकीटाच्या दरात महामुंबई मेट्रोने तिकीट दरात १० टक्के सवलत दिलीय.

मुंबई मेट्रो मार्ग २ अ आणि ७ च्या सर्व प्रवाशांना २० मे, २०२४ रोजी प्रवासी तिकिटावर (मूळ तिकिटदरावर) १०% सवलत देण्याचा महत्त्वाचा निर्णय महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने घेतलाय. या सवलतीचा लाभ मुंबई मेट्रो १ कार्ड, मोबाईल क्यूआर तिकीट, पेपर तिकीट अशा सर्व माध्यमातून घेता येईल. मुंबई मेट्रो मार्ग २ अ आणि ७ च्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ९० कोटी नागरिकांनी प्रवास केला असल्याने मुंबई मेट्रोचा उपयुक्तता अधोरेखित झालीय.

मुंबईमध्ये लोकसभा निवडणूक २०२४ च्या पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे, २०२४ रोजी पार पडणार आहे. लोकशाहीच्या या उत्सवात मतदार मतदान करण्याकरीता लोकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांचा जागरूकपणे सहभाग वाढावा, यासाठी शासनामार्फत सर्व स्तरातून जनजागृती करण्यात येतेय. सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नागरिकांना मेट्रोच्या माध्यमातून आरामदायक प्रवास करत, मतदानाचा आपला हक्क बजावता यावा यासाठी महामुंबई मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. मुंबई मेट्रोने जास्तीत जास्त नागरिकांनी प्रवास करावा या दृष्टीने महामुंबई मेट्रो प्रयत्नशील आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करता येईल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT