Mahavikas Aghadi Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO: विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच, लोकसभेतील पराभूत उमेदवारांना पुन्हा संधी देणार?

Maharashtra Legislative Council Election: लोकसभेत पराभूत झालेल्या उमेदवारांना पुन्हा संधी देण्याचा विचार सुरु आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळणाऱ्या जागेवर विदर्भाची लॅाबिंग सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More

वैदेही काणेकर, मुंबई

महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीवरून (Maharashtra Legislative Council Election) महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) रस्सीखेच सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. विधानपरिषदेच्या रिक्त होत असलेल्या ११ जागांसाठी मतांचा कोटा ठरवणार जागा कुणाला जाणार आहेत. अशामध्ये लोकसभेत पराभूत झालेल्या उमेदवारांना पुन्हा संधी देण्याचा विचार सुरु आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळणाऱ्या जागेवर विदर्भाची लॅाबिंग सुरु आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युवक पदाधिकाऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसकडे वरिष्ठ नेत्यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा सुरू आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विदर्भात सुधीर सूर्यवंशी, जयदीप पेंडके यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात ग्रामीण भागातील युवकाच्या शोध सुरू आहे.तर काँग्रेस मुंबईतली अल्पसंख्याक चेहरा उतरवण्याच्या तयारीत आहेत. आता विधानपरिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून कोणा-कोणाला संधी दिली जातेय ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये अस्वस्थता असल्याचे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता महायुतीमधून देखील कोणाला संधी दिली जाणार हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी काही दिवसांपूर्वी निवडणूक जाहीर झाली. येत्या १२ जुलै रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी देखील केली जाणार आहे. विधानसभा आमदारांनी निवडून दिलेल्या विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ येत्या २७ जुलै रोजी संतप असल्यामुळे ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. ही द्विवार्षिक निवडणूक आहे म्हणजेत दोन वर्षांनी यामधील सदस्य बदलत जातात. या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर; माजी IPS आणि प्रसिद्ध गायिकेसहित कुणाला मिळाली संधी?

Hema Malini Birthday: हेमा मालिनी यांनी चित्रपटात काम करण्यासाठी नाव का बदललं? जाणून घ्या कारण

Men's health checkup: वयाच्या पन्नाशीनंतर पुरुषांनी 'या' चाचण्या करूनच घ्याव्यात; या गोष्टींवर लक्ष ठेवा

Maharashtra Live News Update: पालघर - बोईसर तारापूर एमआयडीसीत वायुगळती

Nanded Crime : पती बेपत्ता असल्याची तक्रार;दीड महिन्यानंतर धक्कादायक माहिती आली समोर, प्रियकराच्या मदतीने नदीत जिवंत फेकले

SCROLL FOR NEXT