Parliament Session : संसदेच्या अधिवेशनात घडणार ६ महत्वाच्या घडामोडी; पडद्यामागून इंडिया आघाडीची खेळी काय?

Parliament First Session of 18th Lok Sabha : भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे.
लोकसभा निवडणुकीचा आज निकाल, दिग्गजांचं भवितव्य पणाला; महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाला?
Parliament First Session of 18th Lok SabhaSaam TV

भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. २४ जूनपासून सुरू झालेले संसदेचे अधिवशेन ३ जुलैपर्यंत म्हणजेच १० दिवस चालणार आहे. या अधिवेशनात नव्या खासदारांचा शपथविधी, लोकसभा अध्यक्षांची निवड तसेच इतर महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत. त्यामुळे अधिवेशनाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

लोकसभा निवडणुकीचा आज निकाल, दिग्गजांचं भवितव्य पणाला; महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाला?
NEET घोटाळ्याचे महाराष्ट्र कनेक्शन? लातूरमधून दोघे ताब्यात, एटीएस पथकाचं छापासत्र

विशेष बाब म्हणजे, तब्बल १० वर्षांच्या कालावधीनंतर यंदा लोकसभेत विरोधी पक्ष नेता देखील असणार आहे. निवडणुकीत इंडिया आघाडीला चांगलं यश मिळाल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाची धुरा नेमकी कोण सांभाळणार, हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर स्पीकरची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. कारण चंद्रबाबू नायडू यांच्या उमेदवाराला इंडिया आघाडी पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे वरिष्ठ सदस्य भर्तृहरी महताब यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीवरून अधिवेशनापूर्वीच वाद उफाळून आला आहे. आधीच्या दोन कार्यकाळांपेक्षा यंदा लोकसभेत विरोधकांचे संख्याबळ अधिक झाल्याने एनडीए सरकारची चांगलीच कसोटी लागणार आहे.

24 जून ते 3 जुलै या कालावधीत संसदेत काय होईल?

  • संसदेचे अधिवेशन २४ जूनपासून सुरू होऊन ३ जुलैपर्यंत चालणार आहे. या दहा दिवसांच्या अधिवेशनात एकूण ८ बैठका होणार आहेत. २९ आणि ३० जून रोजी सुट्टी असेल.

  • आज सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारी राष्ट्रपती भवनात भर्त्रीहरी महताब यांना लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ देतील. यानंतर सकाळी ११ वाजता लोकसभेचे कामकाज सुरू करतील.

  • कामकाजाच्या सुरुवातीला लोकसभेचे सरचिटणीस उत्पल कुमार सिंह कनिष्ठ सभागृहासाठी निवडून आलेल्या सदस्यांची यादी मांडतील. यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सभागृहाच्या सदस्यत्वाची शपथ घेण्याचा आग्रह करतील.

  • हंगामी अध्यक्ष राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या स्पीकरच्या समितीला शपथ देतील. ही समिती लोकसभा अध्यक्षांच्या निवडीपर्यंत सभागृहाचे कामकाज चालविण्यात मदत करेल.

  • लोकसभा अध्यक्षपदासाठी बुधवार, २६ जून रोजी निवडणूक होणार आहे. यावेळीही सभापतीपदाची जोरदार चर्चा आहे. चंद्रबाबू नायडू यांनीही अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार दिला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीकडून पडद्यामागून पाठिंबा देण्याची चर्चा सुरू आहे.

  • २७ जून रोजी राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. ज्यामध्ये नवीन सरकारचा पुढील ५ वर्षांचा रोडमॅप देण्यात येईल.

  • राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर २८ जूनपासून चर्चा सुरू होईल. या चर्चेला पंतप्रधान २ किंवा ३ जुलै रोजी उत्तर देतील. संसदेचे अधिवेशन ३ जुलै रोजी संपेल. केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यासाठी, जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांची पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com