Maharashtra Weather News Saam Tv
मुंबई/पुणे

Rain Alert : पुढचे ४ दिवस महाराष्ट्रावर 'अवकाळी' संकट, या जिल्ह्यांना यलो अलर्ट; कुठे, कसं असेल हवामान, वाचा

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात पुढील ४ दिवस अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार असून मराठवाडा आणि विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम

  • मराठवाडा व विदर्भात येलो अलर्ट जारी

  • गारपीट व वादळी वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान

  • शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी

Maharashtra 20 March To 24 March Weather News Update राज्यात अवकाळी पावसाने चांगलाच जोर धरला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक हवामान कायम असल्याने काही जिल्ह्यांमध्ये आणखी २ ते ४ दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे. तर आज काही जिल्ह्यांमध्ये गारपीटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

IMD च्या अंदाजानुसार, उद्या मराठवाडा,विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच परभणी,हिंगोली,जालना,नांदेड,जळगाव जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात २४ मार्चपर्यंत ही परिस्थिती कायम राहणार असून २५ मार्च पासून उन्हाचा तडाखा सुरु होईल.

आज नागपूर, गोंदीया आणि अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर यावेळी सुसाट्याचा वाराही वाहण्याची शक्यता आहे. जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, अकोला, बुलडाणा, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात आज काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे.

धुळ्यात शेतकऱ्यावर अवकाळीच संकट

या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसमोर नवे संकट आणले आहे. धुळे जिल्ह्यामध्ये साक्री, शिरपूर त्याचबरोबर शिंदखेडा आणि धुळे तालुक्यामध्ये काल गारपिट व अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या वतीने आता या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यात येत आहेत. धुळे तालुक्यातील कापडणे शिवारामध्ये कृषी अधिकाऱ्यांनी मक्याच्या नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली आहे. आणि वरिष्ठांपर्यंत या नुकसानग्रस्त शेती पिकाच्या पंचनामाचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आले आहे. यावेळी कृषी अधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त शेती पिकाची पाहणी झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्याने तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल, यासंदर्भात पावल उचलावी अशी मागणी केली आहे. यापूर्वीच्या पिक नुकसानीची अद्यापपर्यंत भरपाई मिळालेली नसून याबाबत देखील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत गेल्या वेळची आणि सध्याची नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP संस्थापक अभिजीत दीपके पुन्हा मैदानात; मुंबई पोलिसांना आंदोलनासाठी पत्र|VIDEO

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टम रिपोर्टमधून खळबळजनक माहिती समोर

Maharashtra News Live Update: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हा प्रशासनाची तातडीची बोलवली बैठक

मोठी बातमी! भाजपच्या संकटमोचकाला काँग्रेसकडून ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Numerology: हा मुलांक असलेल्या लोकांना असते फुशारकी मारण्याची सवय; जेथे तेथे करतात फक्त स्वत: चं कौतुक

SCROLL FOR NEXT