SSC-HSC Result 2026 Saam Tv
मुंबई/पुणे

HSC SSC Result 2026 : दहावी-बारावीच्या निकालाची संभाव्य तारीख आली समोर, आताच करा नोट

MSBSHSE HSC SSC Result Date Update 2026 : दहावी आणि बारावीच्या निकालाकडे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या नजरा लागल्या आहेत. बारावीचा निकाल कधी लागणार? याबाबत संभाव्य तारखा समोर आल्या आहेत.

Namdeo Kumbhar

Maharashtra HSC result 2026 expected date and time : सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल कधी लागणार? याकडे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांच्या (Maharashtra SSC & HSC Result Date 2026) नजरा खिळल्या आहेत. महाराष्ट्र बोर्डकडून अद्याप निकालावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण बारावी (HSC Result 2026 Maharashtra) आणि दहावी बोर्डाचा (SSC Result 2026 Maharashtra) निकाल लवकरच लागेल, असे सांगण्यात येत आहे. पुढील २ ते ३ आठवड्यात बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागू शकतो, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितलेय. (Maharashtra HSC result 2026 expected date and time)

बारावी आणि दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा होऊन आता महिना उलटलाय. त्यामुळे पालक-विद्यार्थी निकालाची अतुरतेने वाट पाहत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) यंदा १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षा घेतल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. तर इयत्ता १०वीचा निकाल एचएससी निकालानंतर १० ते १२ दिवसांत लागू शकतो. पण यावर महाराष्ट्र बोर्डाकडून (MSBSHSE) अद्याप कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही.

बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या १४ लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे पुढील १५ ते २० दिवसात निकाल लागेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. तर दहावी बोर्डाच्या उत्तरपत्रिकांची तपासणी युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच तपासणी पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर लगेच दहावीचाही निकाल जाहीर केला जाऊ शकतो. उत्तर पत्रिका तपासण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आधी बारावीचा आणि नंतर दहावीचा निकाल जाहीर केला जातो. एसएससीचा निकाल ssc.gov.in किंवा mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाईल.

दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल कुठे पाहाल? SSC result 2026 Maharashtra official website link

mahresult.nic.in

hscresult.mkcl.org (१२ वी साठी)

sscresult.mkcl.org (१० वी साठी)

mahahsscboard.in

निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्ही वरील अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता. पण निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्याचा सीट नंबर (Seat Number) आणि आईचे नाव (Mother's Name) असणे आवश्यक आहे. how to check Maharashtra board result online 2026

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Insomnia: निद्रानाशाने हैराण झालात? आत्ताच व्हा सावध, नाहीतर गमवाल जीव

Maharashtra News Live Update: पुणे-सातारा महामार्गावर कंटेनर पलटी होऊन अपघात

Crime news India: बाप की सैतान! पोटच्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केली हत्या, पोलिसांकडून पित्याला अटक

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी कोण घरी घेऊन जाणार? 'हा' नाही 'ही' स्पर्धक मारणार बाजी

Iran vs US War: कोणतीच तारीख निश्चित नाही, अमेरिका विश्वासघातकी; चर्चेच्या दुसऱ्या फेरीदरम्यान इराणचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT