HSC Paper Saam Tv
मुंबई/पुणे

HSC Exam : १०० टक्के हवेत! पुण्यात शिक्षकानेच पुरवली कॉपी, बोर्ड काय कारवाई करणार?

Pune HSC exam copying case details : पुण्यातील बारावी परीक्षा केंद्रावर शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचा आरोप. सामूहिक कॉपी प्रकरण उघड झाल्यानंतर शिक्षण विभागाकडून कारवाईची प्रक्रिया सुरू.

Akshay Badve

Maharashtra HSC exam rules वाशिममधील बारावी परीक्षेतील सामूहिक कॉपी प्रकरणात 27 जणांवर गुन्हे दाखल झाल्याचा प्रकार ताजा असतानाच पुण्यातूनही सामूहिक कॉपीचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे, शिक्षकच मुलांना कॉपी पुरवत असल्याचे समोर आले आहे. शाळेचा निकाल १०० टक्के लावण्यासाठी बारावीच्या परीक्षेत चक्क शिक्षकानेच कॉपी दिल्याची चर्चा पुण्यात सुरू आहे. सामूहिक कॉपीचा प्रकार पुण्यातील धायरी येथील एका परीक्षा केंद्रावर सुरू होता.

राज्यात दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात पार पडावी म्हणून राज्य मंडळाने शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतरही अनेक प्रकार समोर येत आहेत. आतापर्यंत शेकडो जणांवर कॉपी प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुण्यातील धायरी परिसरातील एका केंद्रावर चक्क शिक्षकानीच कॉपी पुरविल्याचे उघड झाले आहे. शाळेचा निकाल शंभर टक्के लागावा म्हणून असे प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे. या प्रकारानंतर पुण्यात खळबळ उडाली आहे. कॉपी प्रकरणात शिक्षक जर दोषी आढळला तर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट निर्देष बोर्डाकडून देण्यात आले आहेत. पुण्यातील धायरी केंद्रावर घडलेल्या प्रकाराचा तपास केला जात आहे. सीसीटीव्ही पथके तपासली जात आहेत, अशी माहिती विभागीय अध्यक्ष औदुंबर उकिरडे यांनी दिली.

बुधवारी बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर होता. येथे नियुक्त शिक्षकाला या शिक्षकाने चिरीमिरी देऊन चहापानासाठी बाहेर पाठवले आणि वर्गाचा ताबा घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीच्या पेपरला लागणारे लाँगबूक वाटून कॉपी करण्यास प्रवृत्त केले. आता हा सगळा प्रकार विद्यार्थ्यानेच पालकाला सांगितले. घडलेल्या प्रकरणानंतर आता बोर्डाने या शिक्षकावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ

बीडमध्ये दहावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वीच शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ पाहायला मिळाला. बीड तालुक्यातील कुर्ला येथे दहावीचे परीक्षा केंद्र आहे. मात्र या केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थांना पेपर सोडविण्यासाठी चक्क मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थी संख्या वाढल्याचे कारण देत हा मंडप उभारण्यात आला असून येथेच विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. शिवाय तापमान वाढत असल्याने उकाड्याचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागणार आहे. बारावीनंतर दहावीची परीक्षा सुरळीत होण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असताना हा सावळा गोंधळ समोर आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Heatwave : राज्याला उन्हाचा चटका, तापमान ४० शी पार; मान्सूनची स्थिती काय? वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra News Live Update: परभणीत उन्हाचा कहर, तापमानाने गाठला 45.2 अंशांचा उच्चांक

जिल्हा परिषद भरतीत महाघोटाळा? बनावट दिव्यांग प्रमाणपत्रावर मिळवली सरकारी नोकरी, महिलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Ladki Bahin Yojana: पुन्हा ईकेवायसी सुरू होणार? एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहि‍णींना दिला शब्द, वाचा नेमकं काय म्हणाले?

राज्य मंत्रिमंडळात मोठा फेरबदल; नवीन मंत्र्यांना खातेवाटप मिळताच राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT