Praful Lodha Saam Tv
मुंबई/पुणे

Honey Trap: पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेवर बलात्कार, प्रफुल्ल लोढांविरोधात आणखी एक गुन्हा

BJP Leader Praful Lodha: प्रफुल्ल लोढा यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील एका महिलेला नोकरीचे आमिष दाखवत तिच्यावर त्यांनी बलात्कार केला. सध्या प्रफुल्ल लोढा मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत.

Priya More

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

हनी ट्रॅप प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात रोज धक्कादायक खुलासे होत आहेत. हनी ट्रॅप प्रकरणामुळे चर्चेत असलेले भाजपचे नेते प्रफुल्ल लोढा यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी पुण्यात प्रफुल्ल लोढांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रफुल्ल लोढाचे पाय आणखी खोलात गेले आहेत.

राज्यातील राजकारणात सक्रिय असलेल्या प्रफुल्ल लोढांच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहरातील बावधन पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ३६ वर्षीय महिलेच्या नवऱ्याला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत प्रफुल्ल लोढा यांनी तिच्यावर बलात्कार केला. प्रफुल्ल लोढा यांनी या महिलेला बालेवाडीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावून घेत तिच्यावर बलात्कार केला.

पीडित महिलेने प्रफुल्ल लोढा यांना विरोध केल्यानंतर त्यांनी तिची सुद्धा नोकरी घालवण्याची धमकी दिली आणि तिच्या इच्छेविरोधात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असे या महिलेने आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. या तक्रारीची दखल घेत बावधन पोलिसांनी प्रफुल्ल लोढा यांच्याविरोधात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम ६४ (१) आणि ३५१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

महिलेने दिलेल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, 'प्रफुल्ल लोढा यांनी मला माझ्या नवऱ्याला नोकरी लावून देतो असे सांगितले होते. याच बहाण्याने त्यांनी मला २७ मे २०२५ रोजी रात्री ८ वाजता बालेवाडीतील एका हॉटेलमध्ये बोलावले. त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर प्रफुल्ल लोढा यांनी मला तुझ्या नवऱ्याला नोकरी लावायची असेल तर त्या बदल्यात मला तुझ्याशी शरीरसंबंध ठेवू दे, अशी मागणी केली. मी याला विरोध केला. त्यावेळी लोढा यांनी मला तुझीही नोकरी घालवेन अशी धमकी दिली. यानंतर माझ्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.'

आता या घटनेमुळे पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याआधी प्रफुल्ल लोढा यांच्याविरोधात आधीत दोन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण करणारा परप्रांतीय अट्टल गुन्हेगार; आरोपीच्या शोधासाठी पोलिसांच्या ५ टीम तयार

Maharashtra Politics: ठाकरेंना रोखण्यासाठी फडणवीसांचं मायक्रोप्लॅनिंग,ठाकरेंचा डाव भाजप कसा उलटवणार ?

Beed Crime: वाल्मीक कराड जेलमध्ये... तरी गँग अ‍ॅक्टिव्ह! सहकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, आमदारांना धमक्या आणि शिवीगाळ|VIDEO

Mumbai Local Train: मुंबई-कसारा लोकल ट्रेनवर दरड कोसळली; दोन प्रवासी जखमी

उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यामागे राजकारण?सरकार आणि धनखडांमध्ये कुठे पडली ठिणगी?

SCROLL FOR NEXT