
राज्यातील राजकारणात हनी ट्रॅपमुळे हाहाकार माजला आहे. हळूहळू हनी ट्रॅपचे प्रकार उघडकीस येत आहे. नाशिकनंतर जळगावातून प्रफुल्ल लोढा यांचं प्रकरण समोर आलं. सध्या हनी ट्रॅप प्रकरणात लोढा मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून, एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. तसेच त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यांची चौकशी करून, यात आणखी कुणाचा सहभाग आहे का?, याचा तपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली
प्रफुल्ल लोढाबाबत एकनाथ खडसे यांनी माहिती दिली. यावेळी खडसेंनी त्याची राजकीय पार्श्वभूमी सांगितली.
'प्रफुल्ल लोढा हा काही वर्षांपूर्वी एक सामान्य कार्यकर्ता होता. नंतर त्याचा राजकारण्यांशी संपर्क आला. आता तो चाळीस - पन्नास कोटींचा मालक आहे. लोढा भाजपमध्ये असून, त्याचे मंत्री गिरीश महाजनांसोबत चांगले संबंध होते. मात्र, त्यानंतर त्यांच्यात दुरावा आला. महाजनांना तो खालच्या पातळीवर शिव्या देऊ लागला', अशी माहिती खडसेंनी दिली.
नंतर प्रफुल्ल लोढानं रामेश्वर नाईक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. लोढाच्या म्हणण्यानुसार, रामेश्वर नाईक हे मुख्यमंत्री कार्यालयात वैद्यकीय कक्षाचं काम पाहतात. त्यानं फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे लोढानं त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. एकनाथ खडसे यांनी प्रफु्ल्ल लोढाचा व्हिडिओही शेअर केला होता.
या व्हिडिओमध्ये प्रफुल्ल लोढानं बरीच माहिती शेअर केली. त्यानं व्हिडिओमध्ये, ' मला ब्लॅकमेल करू नका, १ बटण दाबलं की, संपूर्ण देशात हाहाकार माजेल. ट्रायडंट हॉटेलला काय झालं? हे माहिती आहे', असं लोढानं व्हिडिओत म्हटल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितलं. 'पण असं काय झालं एवढा विरोध असतानाही त्यांचा थेट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपात प्रवेश देण्यात आला. यावेळी गिरीश महाजन यांनी त्यांना पेढा भरवला, असे फोटो आपल्याकडे आहेत', असंही खडसे म्हणाले.
यावेळी एकनाथ खडसेंनी या प्रकरणात एसआयटीची मागणी केली आहे. 'प्रफुल्ल लोढाकडे या प्रकरणाशी संबंधित सगळे व्हिडिओ आहेत. या प्रकरणाची तपासणी पारदर्शक पद्धतीनं होऊ शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाची एसआयटी चौकशी झालीच पाहिजे, ही माझी मागणी आहे', असं खडसे म्हणाले.
प्रफुल्ल लोढा नक्की कोण?
प्रफुल्ल लोढा हे भाजपाचे पदाधिकारी होते. एकेकाळी त्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्याशी निकटचे संबंध होते. मात्र नंतर त्यानं गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीत सामील झाले.
वंचित बहुजन आघाडीकडून जळगाव लोकसभा मतदारसंघातून खासदारकीसाठी त्यांचे उमेदवारीचे नाव जाहीर झाले होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. सामाजिक कार्यकर्ता आणि उद्योजक म्हणूनही प्रफुल्ल लोढा यांची ओळख आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.