Mumbai Ganesh Visarjan Saam Tv
मुंबई/पुणे

Ganpati Visarjan 2024: दिवस उजाडताच 'डी. जे'चा दणका! मुंबई, पुण्यात विसर्जन मिरवणुका अद्यापही सुरु; १८ तासांनी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

Maharashtra Ganpati Visarjan 2024: मुंबई, पुणे, कोल्हापूरमधील गणपती विसर्जनाच्या मिरवणूका अद्याप सुरुच असून आज सकाळपासून पुन्हा डीजेचा दणदणाट सुरु झाला आहे.

Gangappa Pujari

मुंबई, ता. १८ सप्टेंबर २०२४

Maharashtra Ganpati Visarjan 2024: मंगळवार सकाळपासून (ता. १७ सप्टेंबर) राज्यभरात गणपती विसर्जनाचा जल्लोष अन् उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यभरातील घरगुती गणपतींसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील लाडक्या बाप्पाला निरोप दिला दिला. दुसरीकडे मुंबई, पुणे, कोल्हापूरमधील गणपती विसर्जनाच्या मिरवणूका अद्याप सुरुच असून आज सकाळपासून पुन्हा डीजेचा दणदणाट सुरु झाला आहे. तसेच मुंबईतील लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूकही अद्याप सुरु असून लाखो गणेशभक्त लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.

मुंबई, पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुका अद्यापही सुरु....

मुंबईतील गणपती विसर्जनाच्या मिरवणुका अद्यापही सुरूच असून अनेक मानाचे गणपती विसर्जनाच्या प्रतिक्षेत आहेत. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांची गिरगाव चौपारटी परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मध्यरात्री मुंबईमध्ये पावसाच्या सरीही बरसल्या. मुसळधार पाऊस पडून देखील भक्तांचा उत्साह कायम आहे. गणेशभक्तांची गर्दी अन् बाप्पाच्या जयघोषाने मुंबई, पुण्यासह अनेक शहरांमध्ये भक्तीमय वातावरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

१८ तासांनी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर

कालपासून मुंबईतील लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु असून विसर्जनासाठी लालबागचाच राजा चिंचपोकळीच्या चिंतामणी काही वेळातच गिरगाव चौपाटी परिसरात दाखल होतील. कार्यकर्त्यांच्या फौजेसह आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तात लालबागच्या राजाचे आगमन होणार असून तब्बल १८ तासांनी बाप्पाचे विसर्जन होणार आहे. चिंचपोकळी, भायखळा नागपाडा, दोन टाकी, ऑपेरा हाऊस असा प्रवास करत बाप्पाची मिरवणूक गिरगाव चौपाटीवर दाखल होणार आहे.

दुपारी एक वाजता आपल्या मंडपातून निघालेल्या लालबागच्या राजाला गिरगाव चौपाटीवर येता येता सकाळ उजाडली, राजाला चौपाटीवर येता येता तब्बल १८ तास लागले असले तरी भक्तांच्या उत्साहात तीळ मात्र ही कमतरता नव्हती, मध्यरात्री भर पावसात देखील भक्त बाप्पाची आतुरतेने वाट पाहत होते आणि जशी बाप्पांचं चौपाटीवर आगमन झालं तस भक्तांनी एकच जल्लोष केला. यावेळी अनंत अंबानी देखील लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.

पुण्यात डी.जेचा दणका...

दुसरीकडे, पुण्यातील सार्वजनिक मिरवणूक दुसऱ्या दिवशीही जल्लोषात सुरू आहे. काल संध्याकाळी मानाचे पाच गणपतींचे विसर्जन झाल्यावर श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन ९ वाजता संपन्न झाले. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणूक सुरू होती. रात्री पारंपरिक वाद्य वाजवत काही मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला.

ज्या गणेश मंडळांनी डी जे लावले होते ते दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळपासून पुन्हा एकदा विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. सकाळपासून पुन्हा अलका टॉकीज चौकात डी जे चा जोरदार दणदणाट पाहायला मिळत आहे. पोलिसांनी काल रात्री दिलेल्या माहितीनुसार ही विसर्जन मिरवणूक दुपारी १२ पर्यंत सुरू राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT