शिवडीत उमेदवारी कोणाला मिळणार? लालबाग राजाच्या चरणी पत्र, ठाकरे गटात खळबळ!
Mumbai Political News Saam tv

Lalbaugcha Raja 2024 : शिवडीत उमेदवारी कोणाला मिळणार? लालबाग राजाच्या चरणी पत्र, ठाकरे गटात खळबळ!

Shivadi Assembly constituency : ठाकरे गटात शिवडीत मतदारसंघात आणखी एका इच्छुक उमेदवाराचं नाव समोर आलं आहे. या नव्या उमेदवाराचं नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Published on

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. ऐन गणेशोत्सवातही राजकीय पक्षातील नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बैठकांचा सपाटा लावल्याचे दिसून आले. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे मुंबईत गणेश विसर्जनाची धामधुम सुरु आहे. याचदरम्यान लालबाग राजाच्या चरणी वाहण्यात आलेल्या एका पत्राने ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.

सध्या शिवडी विधानसभा मतदारसंघात अजय चौधरी आमदार आहेत. शिवडीत ठाकरे गटाकडून अजय चौधरी हे मोठे दावेदार आहेत. याचदरम्यान लालबाग राजाच्या चरणी वाहिलेल्या पत्रातून आणखी एका इच्छुक उमेदवाराचं नाव समोर आलं आहे. सुधीर साळवी 2024 ला आमदार होउदे...अशा आशयाची चिठ्ठी साळवी समर्थकांकडून लालबागच्या राजाच्या चरणी वाहण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 2024 चा शिवडी विधानसभा आमदार सुधीरभाऊ साळवी चिठ्ठीमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

 शिवडीत उमेदवारी कोणाला मिळणार? लालबाग राजाच्या चरणी पत्र, ठाकरे गटात खळबळ!
Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

आज पहाटे सुधीर साळवी समर्थकांकडून लालबाग राजाच्या चरणी चिठ्ठी वाहण्यात आली. यामुळे अजय चौधरी यांच्यासह सुधीर साळवी देखील शिवडी विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे शिवडीत ठाकरे गटाकडून अजय चौधरी की सुधीर साळवी कोणाला दिली संधी जाणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

कोण आहेत सुधीर साळवी?

सुधीर साळवी हे शिवडी विधानसभा संघटक, दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक म्हणून ठाकरे गटाकडून काम करत आहेत. तर लालबागच्या राजाचे मानद सचिव देखील सुधीर साळवी आहेत.

 शिवडीत उमेदवारी कोणाला मिळणार? लालबाग राजाच्या चरणी पत्र, ठाकरे गटात खळबळ!
Raj Thackeray On Maha Vikas Aghadi : राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये येणार? नेमकं काय म्हणाले?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाने महाविकास आघाडीच्या जागावाटपात मुंबईतील विविध मतदारसंघावर दावे केले आहेत. मुंबईतील दहिसर, वरळी, वांद्रे पूर्व, दिंडोशी, चारकोप, दादर-माहीम, चांदिवली, भांडुप, वर्सोवा, शिवडी, चेंबूर, घाटकोपर, कलिना, अंधेरी पूर्व, विक्रोळी, वडाळा, कुर्ला, जोगेश्वरी, गोरेगाव या मतदारसंघात ठाकरे गटाने चाचपणी सुरु केली आहे. मागाठाणे, अणुशक्तीनगरसाठी देखील ठाकरे गटाचे प्रयत्न सुरु आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com