Pune Traffic Changes: गणेश विसर्जनासाठी पुण्यात वाहतुकीमध्ये मोठे बदल, कोणते रस्ते राहणार बंद? पर्यायी मार्ग कोणता? वाचा सविस्तर...

Pune Traffic Advisory for Ganesh Visarjan 2024: पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. ही मिरवणूक पाहण्यासाठी गणेशभक्त मोठ्या संख्येने येतात. ही गर्दी लक्षात घेता पुण्यातील वाहतुकीमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.
Pune Traffic Changes: गणेश विसर्जनासाठी पुण्यात वाहतुकीमध्ये मोठे बदल, कोणते रस्ते राहणार बंद? पर्यायी मार्ग कोणता? वाचा सविस्तर...
Pune Traffic ChangesSaam Tv
Published On

Pune Traffic Advisory for Ganesh Visarjan: पुण्यातील गणेशोत्सवासोबत गणेश विसर्जन मिरवणूक खूपच चर्चेचा विषय असतो. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी फक्त राज्यातीलच नाही तर जगभरातून लोकं येत असतात. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणू ही साधारण ३० तास चालते. या विसर्जन मिरवणुकीची जगभरात चर्चा होते. पुण्यामध्ये ही विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी होते हे लक्षात घेता दरवर्षी देखील पुण्यातील वाहतुकीच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकीदरम्यान यंदा पुणे शहरातील १७ प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहेत. पुण्यातील नेमके कोणते रस्ते बंद राहणार? आणि पर्यायी मार्ग कोणते? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत...

पुण्यातील वाहतुकित मोठे बदल -

पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने लक्ष्मी रोड, टिळक रोड सह शहरातील प्रमुख १७ रस्ते बंद राहणार आहेत. सकाळी ९ वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत लक्ष्मी रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड, केळकर रोड, शिवाजी रोडसह १७ रस्ते बंद राहणार आहेत. शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते तसेच उपरस्ते वाहतुकीस बंद राहणार आहेत. पुण्यात सकाळी ९ वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. आपत्कालिन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचण्यासाठी त्वरीत मार्ग उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

Pune Traffic Changes: गणेश विसर्जनासाठी पुण्यात वाहतुकीमध्ये मोठे बदल, कोणते रस्ते राहणार बंद? पर्यायी मार्ग कोणता? वाचा सविस्तर...
Ganesh Utsav 2024 : एकदम हटके! ताट, वाट्या ते चमचे, ग्लास... भांड्यांपासून साकारलं गणपतीचं मनमोहक रूप

पुण्यातील १७ प्रमुख रस्ते बंद -

पुण्यातील प्रमुख रस्ते १७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ते १८ सप्टेंबर रोजी मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहेत.

शिवाजी रोड -

शिवाजी रोड काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्शन ते जेधे चौकापर्यंत बंद राहणार आहे.

लक्ष्मी रोड -

लक्ष्मी रोड संत कबीर चौक ते अलका टॉकीज चौकापर्यंत बंद राहणार आहे.

बाजीराव रोड -

बाजीराव रोड सावरकर चौक ते फुटका बुरूज चौकापर्यंत बंद राहणार आहे.

कुमठेकर रोड -

कुमठेकर रोड टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौकापर्यंत बंद राहिल.

गणेश रोड -

गणेश रोड दारूवाला पुल ते जिजामाता चौकापर्यंत बंद राहिल.

केळकर रोड -

केळकर रोड बुधवार चौक ते अलका टॉकीज चौकापर्यंत बंद राहिल.

टिळक रोड -

टिळक रोड जेधे चौक ते अलका टॉकिज चौकापर्यंत बंद राहिल.

शास्त्री रोड -

शास्त्री रोड सेनादत्त चौकी चौक ते अलका टॉकीज चौकापर्यंत बंद राहिल.

जंगली महाराज रोड -

जंगली महाराज रोड झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौकापर्यंत बंद राहिल.

कर्वे रोड -

कर्वे रोड नळ स्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौकापर्यंत बंद राहिल.

फर्ग्युसन रोड-

फर्ग्युसन रोड खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेनगेटपर्यंत बंद राहिल.

भांडारकर रोड -

भांडारकर रोड पी.वाय.सी जिमखाना ते गुडलक चौक ते नटराज चौकापर्यंत बंद राहिल.

पुणे-सातारा रोड-

पुणे-सातारा रोड व्होल्गा चौक ते जेधे चौकापर्यंत बंद राहिल.

सोलापूर रोड -

सोलापूर रोड सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौकापर्यंत बंद राहिल.

प्रभात रोड -

प्रभात रोड डेक्कन पोस्टे ते शेलारमामा चौकापर्यंत बंद राहिल.

बगाडे रोड -

बगाडे रोड सोन्या मारूती चौक ते फडके हौद चौकापर्यंत बंद राहिल.

गुरू नानक रोड -

गुरू नानक रोड देवजीबाबा चौक ते हमजेखाना चौक ते गोविंद हलवाई चौकापर्यंत बंद राहिल.

Pune Traffic Changes: गणेश विसर्जनासाठी पुण्यात वाहतुकीमध्ये मोठे बदल, कोणते रस्ते राहणार बंद? पर्यायी मार्ग कोणता? वाचा सविस्तर...
People Drowned During Ganesh Visarjan : गणेश विसर्जनादरम्यान भीषण दुर्घटना; ८ जणांचा नदीत बुडून मृत्यू, कुटुंबांवर शोककळा

या रस्त्यांवरून वाहतूक वळवण्यात येईल -

पुण्यात गणपती विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत काही ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे रस्ते वाहतूक वळवण्यात येईल.

जंगली महाराड रोड - झाशी राणी चौक

शिवाजी रोड - काकासाहेब गाडगीळ पुतळा

मुदलीयार रोड - अपोलो टॉकीज/ दारूवाला पुल

लक्ष्मी रोड - संत कबीर पोलिस चौकी

सोलापूर रोड - सेव्हन लव्हज चौक

सातारा रोड - व्होल्गा चौक

बाजीराव रोड - सावरकर पुतळा चौक

लाल बहादुर शास्त्री रोड - सेनादत पोलिस चौकी

कर्वो रोड - नळस्टॉप

फर्ग्युसन कॉलेज रोड - गुडलक चौक

Pune Traffic Changes: गणेश विसर्जनासाठी पुण्यात वाहतुकीमध्ये मोठे बदल, कोणते रस्ते राहणार बंद? पर्यायी मार्ग कोणता? वाचा सविस्तर...
Ganesh Visarjan 2024: अनंत चतुर्दशीला मूर्ती विसर्जन केव्हा करायचं? नोट करा तीन शुभ मुहूर्त

नो-पार्किंग रस्ते -

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पुण्यातील काही रस्ते नो-पार्किंग करण्यात आले आहेत. १७ सप्टेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून मुख्य मिरवणूक संपेपर्यंत पोलिस, अग्निशामक दल, रुग्णवाहिका आणि एम.एस.ई.बी यांच्या वाहनांऐवजी सर्व प्रकारच्या वाहनांना हे रस्ते नो-पार्किंग करण्यात आले आहेत.

लक्ष्मी रोड - संत कबीर चौक ते अलका टॉकीज चौक

केळकर रोड - बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक

कुमठेकर रोड - शनिपार चौक ते अलका टॉकीज चौक

टिळक रोड - जेधे चौक ते अलका टॉकीज चौक

बाजीराव रोड - पुरम चौक ते फुटका बुरुज चौक

शिवाजी रोड - गाडगीळ पुतळा ते जेधे चौक

शास्त्री रोड - सेनादत्त पोलीस चौकी ते अलका टॉकीज चौक

जंगली महाराज रोड - झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक

कर्वे रोड - नळस्टॉप ते खंडोजीबाबा चौक

फर्ग्युसन कॉलेज रोड - खंडोजी बाबा चौक ते गुडलक चौक

Pune Traffic Changes: गणेश विसर्जनासाठी पुण्यात वाहतुकीमध्ये मोठे बदल, कोणते रस्ते राहणार बंद? पर्यायी मार्ग कोणता? वाचा सविस्तर...
Pune Ganesh Visarjan 2024: गणेश विसर्जनासाठी पुणेकर सज्ज, अ‍ॅपद्वारे मिळवा मिरवणुकीची माहिती; ६ हजार पोलिस तैनात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com