अक्षय गवळी, अकोला
गणपती बाप्पा हा सर्वव्यापी आणि चराचरात वसलेला आहे, असं म्हटलं जातं. तसंच गणपतीचं रूप 'निराकार' असल्याचंही बोललं जातं. गणरायाचं असंच एक रूप साकारण्यात आलंय अकोल्यात. शहरातल्या मनकर्णा प्लॉट भागातल्या 'वीर भगतसिंग गणेश मंडळा'नं चक्क भांड्यांपासून गणपती बाप्पा बनवलाय. आपल्या स्वयंपाक घरातील दैनंदिन वापराच्या भांड्यांपासून गणपतीचं मनमोहक रूप साकारण्यात आलंय. चला, तर पाहूयात अकोल्यातील भांड्यांपासून बनलेला वीर भगतसिंग मंडळाचा पर्यावरणपूरक गणपती.
ताट, वाट्या, प्लेट्स, चमचे, कोपर, पळी, काटे, ग्लास आणि आणखी बरंच काही तुम्हाला वाटेल ही काही भांड्या़ची यादी असेल. मात्र, तुमच्या-आमच्या स्वयंपाक घराची शान वाढवत असलेल्या या वस्तूंमधून जन्म झालाय विघ्नहर्त्या गणरायाचा.अगदी भांड्यांपासून गणरायाचं हे अनोखं रूप साकारलंय अकोल्यातील वीर भगतसिंग गणेश मंडळानं.
हे मंडळ दरवर्षी हटके गणेशमूर्ती तयार करतंय. गेल्या 55 वर्षांपासून आगळ्यावेगळ्या गणेशमूर्तीसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. यापूर्वी मंडळाने नोटा, गुलाब, पेन्सिल, रुद्राक्ष, कापूस, केळी, नाणी अशा अनेक गोष्टींपासून गणेशमूर्ती तयार केल्या आहेत, अशी माहिती वीर भगतसिंग गणेश मंडळाचे मूर्तीकार आणि अध्यक्ष, टिल्लू टावरी यांनी दिली.
अकोल्यातील सुप्रसिद्ध दिव्यांग मूर्तिकार टिल्लू टावरी हे मंडळाचे अध्यक्ष असून तेच मूर्ती बनवतात. हा गणपती मुस्लिम वस्तीत असल्याने हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक आहे. यावर्षी या मंडळाने निसर्गाशी नातं सांगणारी घरगूती भांड्यांपासून गणेशमूर्ती बनविली आहे. ही मूर्ती नंतर चिखलदरा येथील गणपती संग्राहलयाला दान केली जाणार आहे, अशी माहिती सुद्धा टिल्लू टावरी यांनी दिली आहे.
प्रत्येक व्यक्ती मनोभावे बाप्पाची सेवा करतात. जितके दिवस घरी बाप्पा आहे तितके सर्व दिवस घरी गोड पदार्थ बनवले जातात. बाप्पासह घरातील सर्वच मंडळींना यानिमित्त चमचमीत पदार्थ चाखण्यास मिळतात. बाप्पामध्ये वेगळेपणा असावा म्हणून सर्व व्यक्ती विविध पद्धतीचे इको फ्रेंडली गणेश मूर्ती घरी आणतात. या सर्वामध्ये टावरी यांनी स्वत: तयार केलेल्या मूर्तीची सध्या मोठी चर्चा सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.