- विनायक वंजारे
Kokan Ganesh Utsav : गणेशोत्सव आणि चाकरमानी यांचे अतूट नातं आहे. यामुळेचे मोठ्या प्रमाणात चाकरमानी तळकोकणात दाखल होत आहेत. दरम्यान रेल्वेनं काेकणातील प्रवाशांसाठी जादा गाड्या साेडल्या आहेत. त्याचा लाभ काेकणवासियांनी घेतल्याचे दिसून येत आहे. परंतु जादा गाड्या साेडल्यानं काेकण रेल्वेचं (kokan railway) वेळापत्रक काेलमडल्याचे चित्र आहे.
तळकोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोचला आहे. गणेश उत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण मानला जातो. गणेशोत्सव आणि चाकरमानी यांचे अतूट नातं आहे. याचमुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी तळकोकणात दाखल होत आहेत. मुंबई, पुणे येथून मिळेल त्या वाहनानं चाकरमानी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत कुडाळ रेल्वे स्थानकात दाखल हाेत आहेत.
दरम्यान कोकण रेल्वेचे वेळापत्रक सध्या कोलमडलेल पाहायला मिळतेय. रेल्वे गाडया दोन ते तीन तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना गावाकडे पोहोचण्यासाठी तब्बल 12 ते 14 तासांहून अधिकचा वेळ लागतोय. रेल्वे स्थानकावर पाेहचताच गणपतीचा जयघाेष करीत प्रवासी आपआपल्या गावी उत्साहानं जाताहेत.
कोकण रेल्वे मार्गावरील जवळपास सर्वच गाड्या उशिराने धावत आहेत. कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस, ओखा एक्स्प्रेस, फेस्टिवल स्पेशल, गणपती स्पेशल, जनशताब्दी, संपर्क क्रांती एक्स्प्रेस, मडगाव गणपती स्पेशल या गाड्यांनी असंख्य प्रवासी कोकणात दाखल होत आहेत मात्र जादा गाड्यांमुळे कोकण रेल्वेवरील वाहतूक उशिराने सुरु आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.