Ganesh Chaturthi : गणपतीला कांदा व लसणाचा नैवेद्य का दाखवत नाही ? जाणून घ्या त्याचे कारण

चार्तुमासातील सगळ्यात महत्त्वाचा व आनंदाचा सण गणेशोत्सव.
Ganesh Chaturthi
Ganesh ChaturthiSaam Tv

Ganesh Chaturthi : भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपती सण साजरा केला जातो. हा सण अगदी आनंदात व उत्साहात साजरा करण्याची पध्दत आहे. चार्तुमासातील सगळ्यात महत्त्वाचा व आनंदाचा सण.

यंदा गणपती ३१ ऑगस्ट म्हणजे उद्या आपल्या प्रत्येकाकडे स्थापित होणार आहेत. गणपती आल्यानंतर आपण त्याच्या नैवेद्याची तयारी करतो. नैवेद्याच्या ताटात गणपतीला आवडत असणारे सगळेच पदार्थ आपण त्यात वाढत असतो.

गणपती आल्यानंतर आपल्या घरी हमखास गोडा-धोडाचे पदार्थ देखील बनवले जातील. परंतु, नैवेद्याच्या ताटात आपण कांदा-लसणाचा वापर करत असाल तर आपण वेळीच थांबायला हवे.

Ganesh Chaturthi
Ganpati Sthapana 2022 : पहिल्यांदा तुमच्या घरी गणेशाचे आगमन होतेय ? अशी करा स्थापनेची पूर्वतयारी !

असे म्हटले जाते की, गणपतीच्या काळात कांदा-लसणाचे सेवन वर्ज्य करावे. गणपतीच्या नैवेद्याच्या ताटात कांदा-लसूण घातलेले पदार्थ ठेवू नये. कांदा व लसूण हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात पण तरीदेखील या काळात त्याचे सेवन का करु नये जाणून घेऊया.

कांदा (Onion) व लसूण जितके बहुगुणी आहे तितकेच ते तामसिक पदार्थ आहे. कांदा हा उग्र वासाचा पदार्थ आहे. त्याचे सेवन केल्याने कामवासनात्मक विचार शरीरात थैमान घालतात. तसेच पावसाळ्यात कांदा खाल्ल्याने अपचन, अजीर्ण होते. आयुर्वेदाने कांदा व लसणाचा औषधी वनस्पतीसाठी त्याचा वापर केला आहे.

Ganesh Chaturthi
Ganesh Chaturthi 2022 : लाडक्या बाप्पासाठी बनवा ओरियो बिस्किटचे टेस्टी मोदक!

कांदा व लसूण हे उष्णताहारक पदार्थ आहेत ज्यामुळे ज्वराधिक्य झाल्यास पोटावर, मस्तकावर कांद्याच्या रसाचा वापर केला जातो. तामसिक भोजन म्हणून कांदा व लसूण वर्जित केले जाते. तामसिक भोजन केल्याने अहंकार, वाईट कल्पना, मन अंशात होणे व सतत चिडचिड होते.

Ganpati Bappa Morya
Ganpati Bappa MoryaCanva

गणपतीच्या (Ganpati) काळात आपण सतत त्याची प्रतिमा व त्याचे रुप आपल्या घरातील चहुबाजूला असावे असे आपल्याला वाटते पण अशा तामसिक पदार्थांचा नैवेद्य ठेवल्यास त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो.

यामागील कथा

असे म्हटले जाते की, भगवान विष्णु समुद्रमंथनातून निघालेल्या अमृताचे देवतांमध्ये वाटप करत असताना स्वरभान नावाचा राक्षस देवतांच्या पंक्तीत देवाचं रुप घेऊन बसला आणि त्याने अमृताचे सेवन केले. जेव्हा ही गोष्ट भगवान विष्णुला समजल्यानंतर त्यांनी त्याचे मस्तक धडापासून वेगळे केले. विभक्त झालेल्या मस्तकाला राहू व धडाला केतू म्हटले गेले. त्यातून अमृताचे दोन थेंब पृथ्वीवर सांडले व त्याच्या उत्पतीपासून कांदा व लसणाची निर्मिती झाली.

Lord Vishnu Mohini Avtar
Lord Vishnu Mohini AvtarCanva

अमृतापासून तयार झालेले हे पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी याची उत्पत्ती राक्षसांद्वारे झाली आहे, म्हणून ते अपवित्र मानले जाते आणि पूजेच्या कोणत्याही कार्यात ते समाविष्ट केले जात नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com