Ganpati Sthapana 2022 : अवघ्या काही दिवसात गणेशाचे आगमन घरोघरी होणार आहे. सगळ्यांचा लाडका बाप्पा हा लवकरच काही दिवसात आपल्या घरी विराजमान होईल.
बाजार सगळीकडे रोशनाई, मखर, सध्या बाजारात गणपती आल्याने खरेदी, मखर, मोदक अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळताय. तसेच जागोजागी पूजेचे साहित्य देखील आपल्याला पाहावयास मिळते.
यंदा आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन हे ३१ ऑगस्टला बुधवारी होणार आहे. हा दिवस भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला येतो. पुरणात या दिवसाला विनायकी चतुर्थी, महासिद्धिविनायकी चतुर्थी, वरद चतुर्थी किंवा शिवा या नावांनीही उल्लेखली गेली आहे.
या दिवसात गणेशाची (Ganesh) विधीवत पूजा व अर्चना केली जाते. आपल्या लाडक्या बाप्पाच्या जागेला सजावट करतो. बाजारात मिळणाऱ्या सगळ्या वस्तू आणून ठेवतो. पण पहिल्यांदाच आपल्या घरी बाप्पा येत असेल तर त्याच्या स्थापनेसाठी कोणते साहित्य हवे असते हे आपल्या कळत नाही मिळेल ते आणून आपण गडबड करतो. त्यासाठी बाप्पाच्या स्थापनेसाठी कोणते साहित्य आवश्यक आहे हे जाणून घेऊया.
पूजेचे साहित्य : -
गणेशाची छोटी मूर्ती, श्रीफळ (Coconut), कापड, कापसाची माळा, हार, सुट्टी फुले व नाणी, अत्तरची बाटली, गूळ-खोबरे, सुपारी, देठाची पाने, मिठाई, मोदक, कापूस, अगरबत्ती, कापूर, दूर्वा, हळदी-कुंकू-अबीर-गुलाल, दिवा, तेल, समई, वाती, फळे, पंचामृत, नैवेद्य, चंदन, अष्टगंध, पंचपात्र अश्विनी, जानवे, शमीपत्रे, आंब्याची डहाळी, ताम्हण, कलश, शंख, घंटा, अक्षता आदी साहित्य लागते.
गणपतीची प्राणप्रतिष्ठा करुन आपण त्याची मनोभावे पूजा व अर्चना करावी.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.