Ganesh Utsav : सावधान! POP ची मूर्ती स्थापन केल्यास होणार कारवाई, मंडळाच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना बसणार दणका; न्यायालयाचे आदेश

POP Ganesha Idol with strict financial penalty : गणेश मंडळांसाठी महत्वाची बातमी आहे. पीओपीची मूर्ती स्थापन करणाऱ्या मंडळांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
POPची मुर्ती स्थापन केल्यास होणार कारवाई
POP Ganesha IdolSaam Tv
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर

राज्यात दहीहंडीनंतर आता गणेशोत्सावाची धूम सुरू झालीय. दरम्यान गणेश मंडळांसाठी एक महत्वाचं अपडेट समोर आलंय. पीओपीची मूर्ती स्थापन करणाऱ्या गणेश मंडळांना आता प्रशासनाचा चांगलाच दणका बसणार आहे. त्यांच्यावर कायद्याने कारवाई केली जाणार आहे सोबतच संबंधित पदाधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. आपण खंडपीठाने नेमकं काय म्हटलंय, ते पाहू या.

गणेश मंडळांसाठी महत्वाची बातमी

पीओपीची गणेश मूर्ती स्थापन करणाऱ्या सार्वजनिक मंडळावर कठोर आर्थिक दंडात्मक कारवाईसह शिक्षा देण्याचा अनुषंगाने तरतूद करा, असे आदेश नागपूर खंडपीठाने मनपा आयुक्त आणि पोलीस विभागाला दिलेत. नैसर्गिक जलस्रोतांच्या प्रदूषणावर गंभीर चिंता व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे (Bombay High Court Nagpur Bench) आदेश दिले आहेत.

पीओपीची मूर्ती स्थापन केल्यास

पीओपीच्या मूर्तीची स्थापना करत असेल तर जबाबदार पदाधिकाऱ्यांवर आर्थिक दंड (Nagpur News) लावत, शिक्षा देण्याच्या अनुषंगाने तरतूद करण्याचे आदेशही महानगरपालिका आयुक्तांना, तसेच पोलीस विभागाला न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने सार्वजनिक गणेश मंडळाकडून हमीपत्र घ्यावे, अशीही सूचना केलेली (POP Ganesha Idol) आहे. त्याशिवाय गणेशोत्सव साजरी करण्याची परवानगी देऊ नये, असं न्यायालयाने म्हटलंय. त्यामुळे जर मंडळांनी पीओपीची मूर्ती स्थापन केली तर त्यांना चांगलंच महाद पडणार आहे.

POPची मुर्ती स्थापन केल्यास होणार कारवाई
Pune Ganeshotsav : गणेशभक्तांसाठी मोठी बातमी; गणेशोत्सवातील'एका'चुकीमुळे जाऊ शकता तुरूंगात, पुणे पोलिसांचा महत्वाचा निर्णय

पुणे महापालिकेचा निर्णय

गणेशोत्सवासंदर्भात पुणे महापालिकेने देखील महत्वाचा निर्णय घेतलाय. गणेशोत्सवात जे भाविक गणेश मूर्ती महापालिकेकडे दान करतील, अशा १५ हजार नागरिकांना प्रत्येकी एक सेंद्रिय खताची पिशवी भेट दिली जाणार (Pune Ganeshotsav)आहे. गणेशोत्सवाच्या काळामध्ये गर्दीमुळे कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. हा कचरा उचलला न गेल्याने शहर अस्वच्छ होते. गणपती विसर्जनाच्या वेळी निर्माण नागरिकांकडून संकलित केल्या जाणाऱ्या निर्माल्याचे पाषाण तलाव येथील जागेत खत तयार केले जाणार आहे. यांसदर्भात सामाजिक संस्थांशी महापालिका चर्चा करणार असल्याची माहिती मिळतेय.

POPची मुर्ती स्थापन केल्यास होणार कारवाई
Pune Ganeshotsav 2024: रात्री १०पर्यंत परवानगी, मंडळात CCTV बंधनकारक, पुण्यातील गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर; काय आहेत ११ अटी अन् शर्ती? वाचा सविस्तर...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com