Vadodara-Mumbai Expressway : बडोदा-मुंबई महामार्गाचं महाराष्ट्रातील काम पूर्ण; पनवेल ते बदलापूर प्रवास १५ मिनिटांत, जाणून घ्या सविस्तर

Vadodara-Mumbai Expressway work update : बडोदा-मुंबई महामार्गाचं महाराष्ट्रातील काम पूर्ण झालं आहे. या महामार्गामुळे पनवेल ते बदलापूर प्रवास १५ मिनिटांत होणार आहे.
 बडोदा-मुंबई महामार्गाचं महाराष्ट्रातील काम पूर्ण; पनवेल ते बदलापूर प्रवास १५ मिनिटांत, जाणून घ्या सविस्तर
Vadodara-Mumbai Expressway :Saam tv
Published On

नवी दिल्ली : बडोदा ते मुंबई महामार्गाबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. या महामार्गाचं एकूण काम ६० टक्के पूर्ण झालं आहे. तर या महामार्गाचं महाराष्ट्रातील काम पूर्ण झालं आहे. देशातील गेम चेंजर हायवे समजल्या जाणारा हा महामार्ग नवी मुंबईतील जेएनपीटी बंदरला जोडला जाणार आहे. त्यामुळे मालवाहतुकीचा प्रवास वेगवान होणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बडोदा ते मुंबई महामार्गामुळे बदलापूर आणि नवी मुंबई शहराला कनेटक्टिव्हिटी मिळणार आहे. वाहनधारकांचा प्रवास वेगवान करणारा महामार्ग पुढे मुंबई-पुणे महामार्ग, मुंबई-गोवा महामार्गाला देखील जोडला जाणार आहे. हा महामार्गासाठी इतर मार्गांना जोडण्यासाठी कोट्यवधींचा रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या मार्गांना जोडण्याचं काम जुलै, २०२५ रोजी पूर्ण होणार आहे. प्रत्येक मार्गांना जोडण्याचं काम वेगवेगळ्यांना तारखांना पूर्ण होणार आहे.

 बडोदा-मुंबई महामार्गाचं महाराष्ट्रातील काम पूर्ण; पनवेल ते बदलापूर प्रवास १५ मिनिटांत, जाणून घ्या सविस्तर
Vande Bharat Express : आज ३ नव्या वंदे भारत धावणार, कोणत्या शहरामधून कधी सुटणार? जाणून घ्या सविस्तर

या महामार्गाच्या प्रकल्पात चार पदरी पुलाचाही समावेश आहे. सासूपाडा ते घोडबंदर या चार पदरी पुलाचं काम ९८ टक्के पूर्ण झालं आहे. गंजाड ते तलासरी या टप्प्याचं काम ९० टक्के पूर्ण झालं आहे. अच्छाद ते दहीसरदरम्यान टप्प्याचं काम ४१ टक्के काम पूर्ण झालं आहे. या वर्षातील नोव्हेंबर महिन्यात या टप्प्याचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मोर्बे येथील ४.१६ किलोमीटरचा बोगदा हा यशस्वीरित्या खोदला आहे. बडोदा ते मुंबई या महामार्गावरील दोन दुहेरी बोगद्यापैकी एका बोगद्याचं काम २४ ऐवजी १५ महिन्यात पूर्ण झालं. रस्ते बांधकामातील ४.१६ किलोमीटर लांबीचा सर्वात मोठा बोगदा आहे. बदलापूर ते पनवेल येथील महामार्गाच्या शेवटच्या पॅकजचे १४०० कोटी रुपयांचं काम इरकॉन इंटरनॅशन आणि जे कुमार इन्फ्रा. प्रोजेक्ट या कंत्राटदार कंपन्या करत आहेत.

 बडोदा-मुंबई महामार्गाचं महाराष्ट्रातील काम पूर्ण; पनवेल ते बदलापूर प्रवास १५ मिनिटांत, जाणून घ्या सविस्तर
Vande Bharat Express : पुणे-नागपूर, पुणे-हुबळी मार्गावर वंदे भारत धावणार, तिकिट किती, थांबा कुठे? जाणून घ्या डिटेल्स

या महामार्गामुळे पनवेल ते बदलापूर प्रवास १५ मिनिटांत होणार आहे. या महामार्गामुळे जेएनपीटी बंदरातील कंटेनर हे बदलापूर मार्गे समृद्धी महामार्ग आणि दिल्ली-वडोदरा महामार्गाने केला जाणार आहे. त्यामुळे पनवेल, तळोजा, कल्याण या मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. दुसऱ्या बोगद्याचं काम ८० टक्के पूर्ण झालं आहे. या दुसऱ्या बोगद्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. या दुसऱ्या बोगद्याचं काम ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. दोन्ही बोगद्यांची मध्यभागांची उंची ही १३ मीटर आणि २२ मीटर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com