CM Devendra Fadnavis Saam Tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis: महाराष्ट्र देशाची स्टार्टअप राजधानी, १ लाख ५७ हजार स्टार्टअप; वर्षभरात १५० टक्क्यांनी वाढली गुंतवणूक

National Startup Day: 'देशाची स्टार्टअप राजधानी महाराष्ट्र आहे. आजच्या दिवशी २०१६ मध्ये ४७१ स्टार्टअप होते. आज ही संख्या १ लाख ५७ हजार आहे. ', अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Ganesh Kavade

राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाचे आज उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाचे मुंबईमध्ये आयोजन केले आहे. यामध्ये देशभरातून १ हजार स्टार्टअप्स सहभागी होणार आहे.

मेरीको लिमिटेडचे अध्यक्ष हर्ष मारीवाला, अपग्रेड अँड स्वदेस फाउंडेशनचे सह संस्थापक रॉनी स्क्रूवाला, नायकाच्या संस्थापक फाल्गुनी नायर असे दिग्गज याठिकाणी उपस्थित राहणार आहेत. 'देशाची स्टार्टअप राजधानी महाराष्ट्र आहे. सध्या १ लाख ५७ हजार स्टार्टअप सहभागी झाले आहेत. वर्षभरात १५० टक्क्यांनी गुंतवणूक वाढली.', अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'नॅशनल स्टार्टअप दिवस साजरा करणे आनंदाचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही पॉलिसी घोषित केली. आजच्या दिवशी २०१६ मध्ये ४७१ स्टार्टअप होते. आज ही संख्या १ लाख ५७ हजार आहे. पण या संख्येवर थांबून चालणार नाही. महिला या कामासाठी रोल मॉडेल ठरू शकतात. स्टार्टअपमध्ये सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेलं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. देशाचं स्टार्टअप राजधानी महाराष्ट्र आहे.'

तसंच, 'एका वर्षात स्टार्टअप गुंतवणूक १५० टक्क्यांनी वाढली आहे. भारत जगातील तिसरी सर्वात वेगाने वाढणारी स्टार्टअप इकोसिस्टीम आहे. स्टार्टअप पॉलिसी असणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. आज आपण सिडबीसोबत १०० कोटींचा करार केला आहे. आता प्रत्येक विभागात स्टार्टअपसाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. पंतप्रधान मोदींच्या ease of doing business मुळे हे सोपं झालं आहे.' , असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमत्री पुढे म्हणाले की, 'मी आश्वासित करतो की एक दिवस असा येईल की स्टार्टअप करणाऱ्यांना सरकारकडे येण्याची आवश्यकता भासणार नाही. तंत्रज्ञान हा एक घोडा आहे त्यावर जर तुम्ही स्वार झालात तर तुम्ही जिंकाल. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात खासगी आणि सार्वजनिक विद्यापीठे आहेत. आपण महाराष्ट्राला इआय पॉवर हब बनवूया. स्टार्टअम इकोसिस्टिममधील दिग्गजांना मी महाराष्ट्रात निमंत्रित करतो. त्यांनी आमच्यासोबत काम करावं. संधी ऑफर करणं आमचं काम आहे.'

यासोबतच 'महाराष्ट्रात इनोव्हेशन शहरं निर्माण करू. महाराष्ट्राच्या नव्या स्टार्टअप पॉलिसीचा मसुदा सर्वांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. त्यावर आपण आपले अभिप्राय आणि सूचना द्याव्यात. येत्या दोन महिन्यात सुचनांवर अंमलबजावणी करून महाराष्ट्र देशातील सर्वात चांगली पॉलिसी तयार करेल.', असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे याचा फटका शेतकरी व ग्रामस्थांना

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT