Devendra Fadnavis : राज्यात व्होट जिहादचा दुसरा पार्ट सुरू झालाय; मुख्यमंत्री फडणवीसांचा गंभीर आरोप, पाहा Video

CM Fadnavis Speech In Shirdi : शिर्डी येथे आज झालेल्या भाजपच्या महाअधिवेशनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर वोट जिहादच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली आहे.

अलिकडच्या काळात देशात बांगलादेशी घुसखोर सापडत आहेत. घुसखोरांचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. ते कागदपत्रे बनवून मतदार याद्यांमध्ये घुसत असल्याचा दावा केला. मालेगावमधून शेकडो नवीन जन्मप्रमाणपत्र लोकांना मिळाले. 50-60 वर्षांचे लोक जन्मप्रमाणपत्र काढत आहेत. मालेगाव, अमरावतीतील अंजनगाव याठिकाणी अचानक 100 लोकांना जन्म प्रमाणपत्र मिळत आहे. हा व्होट जिहादचा पार्ट २ सुरू झाला असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शिर्डी येथे आज झालेल्या भाजपच्या महाअधिवेशनात ते बोलत होते.

पुढे फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात व्होट जिहाद, फेक नरेटीव्ह बघितला. परंतु, गेल्या सहा महिन्यात राष्ट्रीय विचारांच्या संघटनांची एकत्र येऊन राष्ट्रवादाचे पुन्हा रोपण केले. पण आम्ही या अराजकतावादी ताकदींना विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे पराभूत केले. भाजप आणि मोदींना पराभूत करता येत नाही, हे जेव्हा काँग्रेस, उबाठा, शरद पवारांची पार्टी यांना वाटलं तेव्हा त्यांनी आराजकतावाद सारख्या शक्तींना एकत्र घेऊन आराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला, असंही आरोप फडणवीस यांनी यावेळी विरोधकांवर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com