Womens Maharashtra Kesari: देवळीत रंगणार महिला महाराष्ट्र केसरीचा थरार! केव्हा, कुठे अन् कधी होणार सामने? जाणून घ्या

Womens Maharashtra Kesari News In Marathi: महिला महाराष्ट्र केसरीचा बिगुल वाजला आहे. ही स्पर्धा केव्हा, कुठे आणि कधी रंगणार? जाणून घ्या.
Womens Maharashtra Kesari:  देवळीत रंगणार महिला महाराष्ट्र केसरीचा थरार! केव्हा, कुठे अन् कधी होणार सामने? जाणून घ्या
maharashtra kesarisaam tv
Published On

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने वर्धा जिल्हा कुस्तीगीर संघ व सार्वजनिक बजरंग व्यायाम शाळा, देवळी तर्फे महिला महाराष्ट्र केसरी लढत व वरीष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा देवळीच्या विदर्भ केसरी रामदास तडस इनडोअर स्टेडीयम येथे 24 व 25 जानेवारीला होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्या हस्ते व माजी खासदार नवनीत राणा यांच्या उपस्थितीत होणार आहे.या स्पर्धेत राज्याच्या 36 जिल्ह्यातून 51 संघ सहभागी होणार आहे.

Womens Maharashtra Kesari:  देवळीत रंगणार महिला महाराष्ट्र केसरीचा थरार! केव्हा, कुठे अन् कधी होणार सामने? जाणून घ्या
Maharashtra Kesari: मैदानात गाळला घाम...पदरी नाही इनाम : पृथ्वीराज पाटील

महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी महाराष्ट्राचे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यासह महिला महाराष्ट्र् केसरी आणि महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेची घोषणा केली.या स्पर्धेचा थरार येत्या २४ आणि २५ जानेवारी दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेतून निवड होणाऱ्या महिला खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर खेळायला पाठवण्याची सुविधा ही महाराष्ट्र कुस्तीगीर संघाकडून केली जाणार असल्याचं, रामदास तडस यांनी सांगितलं.

Womens Maharashtra Kesari:  देवळीत रंगणार महिला महाराष्ट्र केसरीचा थरार! केव्हा, कुठे अन् कधी होणार सामने? जाणून घ्या
Hind kesari 2024: 'हिंदकेसरी'चा किताब पुन्हा महाराष्ट्राकडे; दिल्लीच्या बल्लूला आस्मान दाखवत समाधान पाटीलने मैदान मारलं!

केव्हा आणि कुठे होणार आयोजन?

महिला महाराष्ट्र केसरीचा थरार येत्या २४ आणि २५ जानेवारीदरम्यान रंगणार आहे. ही स्पर्धा वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात असलेल्या, विदर्भ केसरी, मा. खासदार रामदासजी तडस इन्डोअर स्टेडिअममध्ये रंगणार आहे. यापूर्वी २०२३ मध्ये झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सांगलीच्या प्रतिक्षा बागडी हिने जेतेपदावर नाव कोरलं होतं. तिने अंतिम फेरीत कल्याणच्या वैष्णवी पाटील हिच्यावर विजय मिळवला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com