Maharashtra Kesari 2023: महाराष्ट्र केसरी स्पर्धेत वैष्णवी पाटीलची सुवर्ण कामगिरी! 62 किलो वजनी गटात पटकावलं गोल्ड मेडल

Vaishnavi Patil Won Gold In Maharashtra Kesari 2023:चंद्रपूर ब्रम्हपुरी येथे झालेल्या दुसऱ्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कल्याणची वैष्णवी पाटील हिने दमदार कामगिरी केली आहे
vaishnavi patil
vaishnavi patilsaam tv news

अभिजित देशमुख

Wrestler Vaishnavi Patil Won Maharashtra Kesari 2023:

चंद्रपूर ब्रम्हपुरी येथे झालेल्या दुसऱ्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत (Maharashtra Kesari) कल्याणची वैष्णवी पाटील (Vaishnavi Patil) हिने दमदार कामगिरी केली आहे .62 किलो वजनी गटात खेळताना वैष्णवी पाटील हिने सुवर्ण पदक पटकावले आहे .तर कल्याणमधील सानिया देसले हिने कुमार गटातून 46 किलो वजनी गटात खेळताना कांस्य पदक मिळवले.

कल्याण डोंबिवली कुस्तीगीर संघटनेतर्फे नांदिवलीचे माजी सरपंच रामदास ढोणे,कुस्तीगीर संघटनेचे पंढरीनाथ ढोणे, वसंत साळुंखे यांच्यासह ग्रामस्थांनी आज वैष्णवी पाटील व सानिया देसले या विजयी खेळाडूंचे कल्याण रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत केले.

वैष्णवी अंबरनाथ तालुक्यातील मंगरूळ या गावातील आहे. लहानपणापासूनच तिलाच नव्हे तर आई वडिलांना देखील कुस्तीची विशेष आवड होती. वैष्णवीच्या कुटुंबीयांनी तिला कुस्तीसाठी प्रोत्साहन दिलं. वैष्णवी पाटील हिने कल्याणमधील नांदीवली गावातील जय बजरंग तालमीत कुस्तीच धडे गिरवले .

सहा ते सात राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिचा दरारा पाहायला मिळाला आहे. मार्चमध्ये महिला कुस्तीगीरासाठी सांगली येथे आयोजित पहिल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कल्याणच्या मातीतील वैष्णवी पाटील हिने चमकदार कामगिरी करत कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता .त्यापाठोपाठ वैष्णवीने चंद्रपूर येथील चमकदार कामगिरी करत गोल्ड मेडल पटकावले आहे. (Latest sports updates)

vaishnavi patil
IND vs SA 2nd T20I: द.आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा पराभव का झाला? ही आहेत ४ प्रमुख कारणं

कल्याणमधील सानिया देसले हिने देखील कांस्य पदक पटकावले . या विजयाबाबत बोलताना वैष्णवी पाटीलने समाधान व्यक्त केले तसेच माझं लक्ष ऑलिंपिक असल्याचे सांगितले .वैष्णवी पाटील तिच्या यशानंतर कल्याण डोंबिवली शहरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

vaishnavi patil
IND vs SA, 2nd T20I: द.आफ्रिकेला धूळ चारण्यासाठी टीम इंडियाचा 'प्लान बी'तयार; अंतिम लढतीत होऊ शकतो मोठा बदल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com