मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरळी ते शिवडी नव्या उड्डाणपुलाची घोषणा केली
या प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूक आणि प्रवासाचा वेळ कमी होणार
मुंबईत मोठा टनेल कनेक्शन आणि एसी लोकलची सुविधा मिळणार
पुढील ५–७ वर्षात मुंबईचा पायाभूत विकास वेगाने वाढणार
मुंबईकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. वरळी ते शिवडी यादरम्यान नव्या उड्डाणपुलाचं नियोजन करण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पुढील ५ ते ७ वर्षात मुंबईचा विकास झपाट्याने होणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. युथ कनेक्टिव्हिटीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. यामुळे प्रवाशांचा वेग वाढणार असून प्रवासाचा ताण कमी होणार आहे.
मुंबईतील वरळी डोममध्ये आज 'युथ कनेक्टिव्हिटी' हा कर्यक्रम पार पडला. मुंबई पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणाईंसोबत गप्पा मारल्या. शिवाय मुंबईतील होणाऱ्या विकासकामांवर देखील चर्चा केली. या कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी मुंबईत झालेला विकास हा फक्त ट्रेलर असून पिक्चर अभी बाकी है. मुंबईचा पुढील ५ ते ७ वर्षात मोठा विकास होणार आहे, असं म्हटलं.
याशिवाय मुख्यमंत्र्यांनी वरळी ते शिवडी या नव्या उड्डाणपुलाचं नियोजन असल्याचं म्हटलं आहे. वरळी ते शिवडी या नव्या उड्डाणपुलामुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार असून ही कनेक्टिव्हिटी महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलं. मुंबईचा विकास करायचा असेल तर त्यासाठी कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, "आम्ही मुंबईत पाताळ लोक तयार करत आहोत, म्हणजेच मुंबईत एक मोठं आम्ही टनेलच कनेक्शन तयार करणार आहोत. कनेक्टिव्हिटी वाढवतोय कारण यामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. याशिवाय आम्ही मुंबई लोकलचा प्रवास वातानुकूलित करणार असून त्याच्या तिकिटांमध्ये एकही रुपया वाढवणार नाही." असे ते म्हणाले. दरम्यान या नवनवीन प्रकल्पांमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून प्रवास आरामदायी होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.