Maharashtra Cabinet Meeting  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Cabinet Meeting : कोतवाल आणि ग्राम रोजगार सेवकांसाठी महत्वाची बातमी; मानधनात होणार इतकी वाढ, वाचा सविस्तर

kotwal and gram rojgar sevak salary : कोतवाल आणि ग्राम रोजगार सेवकांसाठी राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत दोघांच्या मानधनात वाढ करण्यात आला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ३८ महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत कोतवाल आणि ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनाबाबत देखील महत्वाचे निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयाने कोतवाल आणि ग्राम रोजगार सेवकांना मोठा लाभ होणार आहे.

आज घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्यात आलं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला अथवा कर्मचारी निवृत्त झाले, अशा कर्मचाऱ्यांच्या निधीत वाढ करण्यात आली आहे. याचबरोबर सेवानिवृत्ती उपदान १४ लाखांवरुन थेट २० लाख रुपये ऐवढा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गाव गाडा हाकण्यास मदत करणाऱ्या कोतवाल आणि ग्राम रोजगार सेवकांच्या मानधन वाढ करण्याविषयी मोठा निर्णय घेण्याला आला आहे.

कोतवालांच्या मानधनात झाली वाढ

राज्यातील कोतवालांच्या मानधनत दहा टक्के वाढ करण्याबाबत निर्णय झाला आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर कोतवाल कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू करण्यासही मंजूरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातील १२ हजार ७९३ कोतवालांना याचा लाभ मिळणार आहे.

कोतवाल यांना मिळणाऱ्या १५ हजार रुपये इतक्या मानधनात ही वाढ देण्यात येणार आहे. कोतवाल हे सेवेत असताना मृत्यू झाल्यास किंवा गंभीर आजार, अपघातामुळे असमर्थ ठरल्यास शासनाच्या अनुकंपा धोरणानुसार त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यासही मंजूरी देण्यात आली.

ग्राम रोजगार सेवकांचं मानधन ठरलं

राज्यातील ग्राम रोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन मिळणार आहे. तसेच प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. ग्रामपातळीवरील ग्रामरोजगार सेवकांनी २ हजार पेक्षा जास्त दिवस काम पूर्ण केले आहेत. त्यांना मजुरी खर्चाच्या एक टक्के प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल. २००० दिवसांपर्यंत काम केलेल्या ग्रामरोजगार सेवकांना दर महिना १००० रूपये आणि दोन हजार एक पेक्षा जास्त दिवस काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना दरमहा २००० रुपये प्रवास भत्ता आणि डेटा पॅककरिता अनुदान देण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT