Abdul Sattar, Sanjay Rathod Saam TV
मुंबई/पुणे

मोठी बातमी! अब्दुल सत्तार यांच्यासह संजय राठोडही घेणार मंत्रिपदाची शपथ

अब्दुल सत्तार यांच्यासह संजय राठोडही मंत्रिपदाची शपथ घेणार

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : नव्या सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराला आता अवघे काही तास उरले आहे. थोड्याच वेळात राजभवनात भाजप आणि शिंदे गटातील आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. पहिल्या टप्प्यात शपथ घेणाऱ्या आमदारांची नावं देखील निश्चित झाली आहेत. यामध्ये सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार आणि यवतमाळचे आमदार संजय राठोड हे सुद्धा शपथ घेणार असल्याचं निश्चित झालं आहे. (Abdul Sattar Sanjay Rathod Latest News)

आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहेत. राजभवनात आज पहिल्या टप्प्यात 18 आमदारांचा शपथविधी होणार आहे. यामध्ये भाजपचे 9 आणि शिंदे गटातील 9 आमदारांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे अब्दुल सत्तार हे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या नावाची खुर्ची राजभवनातील हॉलमध्ये लावण्यात आली आहे. टीईटी घोटाळ्यात नाव आल्यानंतरही सत्तारांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे.

दुसरीकडे अब्दुल सत्तार यांच्याबरोबरच यवतमाळचे आमदार संजय राठोड यांचीही मंत्रिपदी वर्णी लागणार आहे. मंत्रिपदासाठी आता संजय राठोड यांचंही नाव निश्चित झालं आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर संजय राठोड यांना वनमंत्रिपद मिळाल होतं. मात्र एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात त्यांचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

शिंदे गटात कुणाला मिळणार मंत्रिपद

गुलाबराव पाटील

संदिपान भूमरे

दीपक केसरकर

तानाजी सावंत

शंभुराजे देसाई

दादा भुसे

उदय सामंत

संजय राठोड

अब्दुल सत्तार

भाजपकडून हे नेते घेणार शपथ

चंद्रकांत पाटील

गिरीश महाजन

सुधीर मुनगंटीवार

रवींद्र चव्हाण

राधाकृष्ण विखे पाटील

विजयकुमार गावित

सुरेश खाडे

अतुल सावे

मंगल प्रभात लोढा

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

Heart Attack: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये फरक काय?

SCROLL FOR NEXT