मुंबई : तब्बल महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर आज शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास 18 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे. पहिल्या टप्प्यातील या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या सर्वाधिक आमदारांचा शपथविधी होणार आहे. तर शिंदे गटातील मोजक्याच आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. (Mla Bacchu Kadu Latest News)
पहिल्या टप्प्यातून मात्र अपक्ष आमदारांना वगळण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे अमरावतीचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा शपथविधी सोहळा होणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळालं नाही तर, आम्ही शेतकऱ्यांसाठी भांडत राहू असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. 'मित्रपक्षाशिवाय सरकार चालत नाही निश्चित आम्हाला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळेल, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. (Maharashtra Cabinet Expansion LIVE Updates)
आमदार अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळ विस्तारातून पत्ता कट?
दुसरीकडे शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. यामुळे अब्दुल सत्तार नाराज असल्याची माहिती आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमधील घोटाळ्यात आमदार अब्दुल सत्तार यांचेही नाव असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरुन सत्तार हे सोमवारी दिवसभर चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले होते. शिवाय विरोधकांनीही त्यांच्यावरील आरोपांची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यामुळे त्यांना मंत्रिपदही मिळणार की नाही? अशी चर्चा जोरदार सुरू आहे.
दुसरीकडे अब्दुल सत्तार यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला रवाना झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय आदेश देतात त्यानुसार मी माध्यमांना बोलतो असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.