Maharashtra Assembly Budget Session 2023-2024  Saam tv
मुंबई/पुणे

Governor Ramesh Bais : राज्यात मोठी नोकरभरती, मराठा समाजासाठी विशेष योजना, राज्यपालांच्या अभिभाषणातील महत्त्वाचे मुद्दे

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी अभिभाषण करत अधिवेशनाची सुरूवात केली

Satish Daud

Maharashtra Assembly Budget Session 2023-2024 : आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरूवात झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होते. त्यानुसार, महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी अभिभाषण करत अधिवेशनाची सुरूवात केली. या अभिभाषणात राज्यपालांनी राज्य सरकारच्या कामांची, मदतनिधीची, तसेच वेगवेगळ्या योजना राबवणार असल्याची माहिती दिली. (Latest Marathi News)

मराठा समाजासाठी राज्य सरकारच्या विशेष योजना, राज्यात ७५ हजार युवकांसाठी नोकरी भरत्या. जानेवारी 2023 मध्ये 1 लाख 35 हजारांच्या गुंतवणुकीचे करार, जुन्या पेन्शन योजनेत बदल, अशा राज्य सरकारच्या विविध कामांचा लेखाजोखा त्यांनी आपल्या अभिभाषणाने पटलावर ठेवला.

याशिवाय राज्यातील शेतकऱ्या २४ तास वीजपुरवठा व्हावा, यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या मिशन २०२५ योजनेची सुद्धा त्यांनी माहिती दिली. याशिवाय, युवकांसाठी गडचिरोली, गोंदियामध्ये प्रशिक्षण केंद्र तसेच राज्य सरकारने हाती घेतलेल्या मेट्रोच्या अनेक नव्या योजनांबाबतही त्यांनी माहिती दिली.

राज्यपालांच्या अभिभाषणातील महत्वाचे मुद्दे

  • - सीमाभागातील लोकांसाठी राज्य सरकारच्या विविध योजना

  • - राज्यातील तरुणांसाठी ७५ हजार नोकरी भरत्या

  • - जानेवारी 2023 मध्ये 1 लाख 35 हजारांच्या गुंतवणुकीचे करार

  • - मराठा समाजासाठी राज्य सरकारच्या विशेष योजना

  • - युवकांसाठी गडचिरोली, गोंदियामध्ये प्रशिक्षण केंद्र

  • - पेन्शन योजनेतही राज्य सरकारकडून बदल

  • - मैत्री योजनेतून अनेक सुविधा उपलब्ध

  • - सरकारने मेट्रोच्या अनेक नव्या योजना हाती घेतल्या आहेत.

  • - मुंबईकरांसाठी आपला दवाखाना योजना राबवली

  • - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून मेट्रो प्रकल्प

  • - आर्थिक सल्लागार समितीची घोषणा

  • - सी-लिंकचं काम तातडीने पूर्ण करणार

दरम्यान, राज्यपालांच्या अधिवेशनानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. त्यामुळे या अधिवेशनात विरोधकांकडून सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरण्याचा प्रयत्न असणार आहे. शिवसेनेच्या व्हिपवरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ होण्याची शक्यता आहे. सत्तासंघर्ष, शेतकऱ्यांचा मुद्दा, पोटनिवडणूक प्रचारातील गैरप्रकार यासह अनेक मुद्द्यांवरुन सरकार आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

SCROLL FOR NEXT