Kasba Bypoll Election: हेमंत रासनेंसह भाजपच्या 'या' नेत्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

काल कसबा विधानसभा पोट निवडणुकीसाठी मतदान पार पडले आणि आज भाजपच्या दोन नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Hemant Rasne
Hemant RasneSaam Tv
Published On

Kasba Bypoll Election News Update : काल (२६ फेब्रुवारी) कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. त्यानंतर आज (२७ फेब्रुवारी) एक मोठी बातमी समोर आली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रासने हे मतदान केंद्रात भाजपचे (BJP) म्हणजेच कमळाचे चिन्ह असलेले उपरण घालून गेल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रासने यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hemant Rasne
Nashik : एकच पक्ष कांद्यावर लक्ष... शेतक-यांनी कांदा लिलाव पाडला बंद, लासलगाव बाजार समितीत बेमुदत आंदाेलन सुरु

काल कसबा विधानसभा पोट निवडणुकीसाठी मतदान पार पडले. यावेळी मतदान करण्यासाठी गेलेल्या हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी भाजपचे अधिकृत चिन्ह असलेले उपरन गळ्यात घालून मतदान केले. यावरून निवडणूक आयोगाकडून रासने यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

रासने यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केली होती. त्यानंतर आता रासने यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता रासने यांच्यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Hemant Rasne
Bribe : दहा हजारांची लाच घेतल्याने भूमी अभिलेख कर्मचा-याला रंगेहाथ अटक

गणेश बिडकर यांच्यावर गुन्हा दाखल

तर दुसरीकडे भाजपच्या आणखी एका नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्या प्रकरणी भाजप गणेश बिडकर यांच्यावर पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश बिडकर यांच्यासह मयूर चव्हाण, मयूर शेख आणि बाला शेख या तिघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप पक्षाचे नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar) हे पुण्यातील मंगळवार पेठ या ठिकाणी मतदारांना पैशाचे वाटप करत आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्तांनी बिडकर यांना विरोध केला. यावेळी बिडकर आणि त्यांच्या इतर साथीदारांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com