Maharashtra Assembly Speaker Election
Maharashtra Assembly Speaker Election Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Assembly Speaker: पहिल्याच परीक्षेत शिंदे सरकार पास; भाजपचे राहुल नार्वेकर विजयी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड झाली. अध्यक्षपदासाठी भाजपचे (BJP) राहुल नार्वेकर, तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत झाली. या लढतीत भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले.

राहुल नार्वेकर यांना आतापर्यंत १४५ पेक्षा जास्त सदस्यांचे मतदान झाले आहे. बहुमताचा आकडा त्यांनी पार केला आहे. बहुजन विकास आघाडी, मनसे आणि बच्चु कडू यांच्या पक्षाने राहुल नार्वेकर यांना मतदान केले आहे. नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदाची फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे.

सरकार स्थापन केल्यावर लगेचच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार रविवार आणि सोमवार असे दोन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडला जात आहे.

सभागृहात प्रत्यक्ष मतमोजणी सुरु असताना काही सदस्य गोंधळ घालत होते. काही सदस्य आसन क्रमांक सांगत असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. यावर जयंत पाटील यांनीदेखील उभे राहून प्रक्रिया व्यवस्थित राबवण्यास सांगितली. यानंतर मोजणीस सुरुवात झाली.

या निवडणुकीत (Election) समाजवादीचे दोन्ही आमदार तटस्थ राहिले. त्यांनी ठाकरे सरकाच्या काही निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. महाविकास आघाडीला १०७ मत मिळाली आहेत. तर राहुल नार्वेकर यांना १६४ मत मिळाली आहेत.

विधानसभा उपाध्यक्षांनी यावेळी शिवसेनेचे पत्र वाचून दाखविले. यात शिवसेना पक्ष आमदारांनी पक्ष व्हीप विरोधात जाऊन मतदान केले आहे. पक्ष आदेश विरोधात मतदान केले आहे, या सदस्यांचे पक्ष विरोधात मतदान केले ते रेकॉर्ड वर घ्यावे, असे वाचून दाखविले.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beet juice : या लोकांनी चुकूनही पिऊ नये बीटचा ज्यूस

Dharashiv News : धाराशिवमध्ये १६ बालकांना इंजेक्शनची रिअॅक्शन; ताप, उलटीमुळे हैराण

Special Report : Pune Lok Sabha | भाजपची हॅट्रीक की कॉंग्रेसचं कमबॅक?

Rohit Pawar News | बारामतीच्या प्रचारातील व्हिडीओ व्हायरल, प्रचाराचे पैसे न दिल्याचा आरोप

Poha Idli : सकाळी नाश्त्यात बनवा पोहा इडली; जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT