Jayant Patil vs Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : 'मनावरचा दगड काढून टाका, आमच्याकडे या'; जयंत पाटलांची शिंदेंना खुली ऑफर

जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना खुली ऑफरही दिली

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवसही विरोधकांनी गाजवला. विधानपसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे सरकारला चांगलेच टोमणे मारले. विधानसभेत बोलताना आज जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना खुली ऑफरही दिली. 'भाजपमध्ये तुमचा अपमान होत आहे. तुम्ही आमच्याकडे या. तुम्हाला इकडे मुख्यमंत्री बनायला कोणती अडचण नाही', असं जयंत पाटील म्हणाले. (Maharashtra Assembly Monsoon Session News Updates)

आम्ही मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं आहे, असं विधान काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. याच विधानाला धरून जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुली ऑफर दिली.

काय म्हणाले जयंत पाटील?

'भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले की मनावर दगड ठेवून आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, त्यामुळे तो मनावरचा दगड काढून टाका आणि इकडे या... इकडे तुम्हाला मुख्यमंत्री बनायला काही अडचण येईल असं मला वाटत नाही' अशी खुली ऑफर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. (Eknath Shinde vs Jayant Patil Latest News)

याशिवाय जयंत पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील व्हायरल झालेल्या फोटोवरूनही विधान केलं. 'मुख्यमंत्री दिल्लीत गेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या छायाचित्रात त्यांना तिसऱ्या क्रमांकाच्या रांगेत उभे राहावे लागले. हा महाराष्ट्राचा अवमान आहे. आम्ही तो सहन करणार नाही. खरे तर त्यादिवशीच मुख्यमंत्र्यांनी तेथून बाहेर पडायला हवे होते', असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

शिंदे गटातील नेत्यांची उडवली खिल्ली

दरम्यान, जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे गटातील इतर नेत्यांची खिल्ली देखील उडवली. खातेवाटपावरून शिंदे गटातील नाराजीवर जयंत पाटलांनी टोमणे मारले. 'शंभूराज देसाई यांना उत्पादनशुल्क सारखे किरकोळ खाते दिले. आमचे शिवेंद्रसिंह भोसले हे साताऱ्याचे पालकमंत्री होण्यासाठी म्हणून भाजपमध्ये गेले. त्यांनाही काही मिळाले नाही. संजय शिरसाट, आशिष जयस्वाल, बच्चू कडू अशी नाराजांची फौज या सरकारमध्ये आहे'. अशी टोलेबाजी जयंत पाटलांनी केली.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT