Amravati Daryapur Bacchu Kadu News
Amravati Daryapur Bacchu Kadu NewsSaam TV

Bacchu Kadu : बच्चू कडूंच्या 'प्रहार'ला मोठं खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
Published on

अमर घटारे, साम टिव्ही

अमरावती : राज्यात एकीकडे शिंदे गट (Eknath Shinde) विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा राजकीय सामना रंगला असतानाच, दुसरीकडे अमरावतीत शिवसेनेनं बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना मोठा धक्का दिला आहे. दर्यापूर तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा तालुकाप्रमुख किरण होले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. (Amravati Bacchu Kadu Todays News)

Amravati Daryapur Bacchu Kadu News
Latur News : बायको नांदायला येत नसल्याने नवऱ्याला राग अनावर; सासूसोबत केलं भयंकर कृत्य

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. किरण होले हे अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष होते. मात्र, आता त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत हातात शिवबंधन बांधलं आहे.

प्राप्त माहितीनुसार, अमरावती शिवसेना जिल्हाप्रमुख खराटे यांच्या नेतृत्वात किरण होले यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय. त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषदचे अपक्ष असलेले सदस्य सुनील डिके यांनी सुद्धा हाती शिवबंधन बांधलं आहे. (Bacchu Kadu Prahar Latest News)

Amravati Daryapur Bacchu Kadu News
अमित शहाजी, हे शिंदे गटाचे MLA मविआच्या आमदारांना खुलेआम धमकावताहेत; सुप्रिया सुळे कडाडल्या

याव्यतिरिक्त दर्यापूर तालुक्यातील खल्लार येथील काँग्रेसचे सरपंच योगेश मापारी यांचा सुद्धा शिवसेनेत प्रवेश केलाय. अचानक प्रहारच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने अपक्ष आमदार बच्चू कडू यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. या प्रवेशामुळे दर्यापूर तालुक्यात शिवसेना पुन्हा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com