Ajit Pawar : तुमच्या घरासमोरच डान्सबार, तो बंद करून दाखवा; अजित पवारांचा शिंदेंना टोला

अजित पवार यांनी आज विधानसभेत भाषण करताना आज पुन्हा एकदा टोलेबाजी केली.
Ajit Pawar Eknath Shinde
Ajit Pawar Eknath ShindeSaam TV
Published On

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. पाचव्या दिवशीही विरोधकांनी विविध मुद्द्यावरून शिंदे (Eknath Shinde) सरकारला चांगलंच धारेवर धरलं. विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज विधानसभेत भाषण करताना आज पुन्हा एकदा टोलेबाजी केली. मी ठाण्यातील डान्सबार फोडले या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानाचा अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला. आमच्या काळात डान्स बार बंद केले होते. मात्र आता ठाण्यात सर्रासपणे डान्सबार सुरू आहेत, असा टोलाही अजित पवार यांनी शिंदेंना लगावला. (Ajit Pawar vs Eknath Shinde Latest News)

Ajit Pawar Eknath Shinde
Param Bir Singh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग प्रकरणात नवा ट्विस्ट

एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?

'मी स्वत: ठाण्यातील डान्सबार फोडले. तेव्हा गुंडांनी मला टार्गेट केलं होतं. पण धर्मवीर आनंद दिघे यांनी त्यावेळी मला वाचवलं. डान्स बार फोडणारा मी पहिला नेता आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. इतकंच नाही तर, बहुमत सिद्ध केल्यानंतर सोळा डान्स बार फोडणारा मी आहे असं देखील एकनाथ शिंदे यांनी छातीठोकपणे सांगितलं होतं.

अजित पवारांचं एकनाथ शिंदेंना उत्तर

एकनाथ शिंदे यांनी डान्सबार फोडल्याच्या या विधानाचा अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. आमच्या काळात तुम्ही डान्स बार बंद केले होते. मात्र, आता ठाण्यात तुमच्या घराशेजारीच सर्रासपणे डान्सबार सुरू आहेत, असा टोला अजित पवार यांनी हाणला. तुम्ही दोघं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे एकाच नाण्याची दोन बाजू झालेले आहात. कळतच नाही कुठलं नाणं आहे, असा चिमटाही अजित पवार शिंदे-फडणवीस यांना काढला.

Ajit Pawar Eknath Shinde
Bacchu Kadu : बच्चू कडूंच्या 'प्रहार'ला मोठं खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

'सत्तेचा ताम्रपट कुणीही घेऊन आलेले नाही'

'सत्ता आल्यानंतर आनंद होणे हे स्वाभाविक आहे. त्यात दुमत नाही. देवेंद्र फडणवीस तेव्हा म्हणाले होते की, मी पुन्हा येईन. पण नंतर उद्धव ठाकरे आले. सत्तेचा ताम्रपट कुणीही घेऊन आलेले नाही. सत्तारूढ आमदार जाहीरपणे चिथावणी देतात. कशाची मस्ती एवढी आली आहे ? दुसऱ्या एका आमदाराने अधिकाऱ्यांच्या कानाखाली मारली. त्यांच्या कृत्याने संदेश असा जातो की, सर्वच असे वागतात की काय ?'. असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com