Param Bir Singh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग प्रकरणात नवा ट्विस्ट

आरोपींनी ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
Officers investigating Param Bir Singh's case on CBI's radar
Officers investigating Param Bir Singh's case on CBI's radarSaam Tv
Published On

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. ठाणे महापालिका पोलिसांनी क्रिकेट बुकी सोनू जालान, केतन तन्ना आणि केतनचा मुलगा जय केतन तन्ना यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींनी ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. (Param Bir Singh Case Latest News)

Officers investigating Param Bir Singh's case on CBI's radar
Bacchu Kadu : बच्चू कडूंच्या 'प्रहार'ला मोठं खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मिळालेल्या माहितीनुसार आयपीसीच्या कलम ३८४, ३८९ आणि १२० बी अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, तक्रारदाराने म्हटले आहे की, ठाणे महापालिका पोलिसांनी गेल्या वर्षी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग, डीसीपी दीपक देवराज, गुंड रवी पुजारी आणि पोलिस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्यासह २८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणात तक्रारदार यांचाही समावेश होता. आता या तक्रारदाराने असा दावा केला आहे की, त्यांना सोनू जालान आणि केतन तन्ना यांनी संपर्क केला होता. त्यावेळी एफआयआरमध्ये नाव टाकायचं नसल्यास ५० लाख रुपये द्यावे लागतील. अशी मागणी केली होती. (Thane Police Latest News)

Officers investigating Param Bir Singh's case on CBI's radar
Latur News : बायको नांदायला येत नसल्याने नवऱ्याला राग अनावर; सासूसोबत केलं भयंकर कृत्य

दरम्यान, खंडणीचे पैसे दिले नसल्याने आरोपी सोनू जालान, केतन तन्ना यांनी जबरदस्तीने एफआरआरमध्ये आपलं नावं टाकलं. असा आरोप तक्रारदाराने केला. दरम्यान, तक्रारदाराच्या तक्रारीनंतर आता ठाणे पोलिसांनी या प्रकरणात क्रिकेट बुकी सोनू जालान, केतन तन्ना आणि केतनचा मुलगा जय केतन तन्ना यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

परमबीर सिंह हे ठाणे पोलीस आयुक्त असताना २०१८ मध्ये गुन्हे अन्वेषण शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सट्टेबाजांचे रॅकेट उद्धवस्थ केले होते. पोलिसांनी याप्रकरणात काही बॉलीवुड कलाकारांनाही ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी मुंबईतील एक व्यावसायिक केतन तन्ना आणि सोनू जालान यांना अटक केली होती.

या अटकेनंतर आरोपींविरोधातील मोक्का कायद्याअंतर्गत होणारी कारवाई टाळणे तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन पोलीस अधिकारी, कर्मचारी, गुंड रवि पुजारी, दलाल, पोलीस खबरी यांच्यासह २८ जणांनी सोनु जालान यांच्याकडून ३ कोटी ४५ लाख रुपये तर केतन तन्ना याच्याकडून १ कोटी २५ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचे तक्रारीत म्हटले होते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com