Maharashtra Election  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Election : महायुतीत यादवी युद्ध, बंडखोरांमुळे वाढली डोकेदुखी; कोणत्या उमेदवारापुढे थोपटले दंड?

Maharashtra Election 2024 : महायुतीच्या नेत्यांपुढे बंडखोरांनी आव्हान निर्माण केलं आहे. या बंडखोरांनी महायुतीची डोकेदुखी वाढवली आहे.

Vishal Gangurde

गिरीश कांबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक ऐन रंगात आली आहे. सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. काही मतदारसंघात बंडखोरांनी महायुतीची डोकेदुखी वाढवली आहे. या निवडणुकीत अर्ज मागे घेण्यासाठी फक्त २४ तास उरले आहेत. या विधानसभा निवडणुकीत बंडखोरांनी महायुतीची अधिक डोकेदुखी वाढवली आहे. या बंडखोरांनी महायुतीपुढे मोठा पेच निर्माण केला आहे.

राज्यात सध्या एकूण ७ हजार ६६ उमेदवार रिंगणात आहेत. पुढील २४ तासानंतर राज्यातील प्रमुख लढती निश्चित होणार आहेत. बंडोबांना थंड करण्याचे महायुती आणि महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. आज पक्षाचे प्रमुख नेते बंडखोरांची समजूत काढण्यात यशस्वी होणार की नाही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले आहेत. आज बंडखोरांबाबत चर्चा होत असून मित्र पक्षांना पाठिंबा देण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

शिंदेंच्या शिवसेनेविरोधात भाजपचे बंडखोर

पाचोऱ्यात शिंदे गटाचे किशोर पाटील महायुतीचे उमेदवार आहेत. तिथं भाजपच्या अमोल शिंदेंनी बंडखोरी केली.

बुलढाण्यात शिंदेंचे संजय गायकवाड अधिकृत उमेदवार आहेत. येथे भाजपच्या विजयराज शिंदेंनी बंडखोरी केली आहे.

मेहकरमधून रायमुलकरांना शिंदेंचं तिकीट मिळालंय, येथे भाजपच्या प्रकाश गवईंनी बंड केले आहे.

ओवळा माजीवाड्यातून शिंदेंच्या प्रताप सरनाईकांविरोधात भाजपचे उपमहापौर राहिलेल्या हसमुख गेहलोतांनी बंड पुकारलं आहे.

पैठणमध्ये शिंदेंच्या विलास भुमरेंविरोधात भाजपच्या सुनिल शिंदेंनी बंडखोरी केली आहे.

जालन्यात शिंदेंच्या अर्जुन खोतकरांविरोधात भाजपचे भास्कर दानवेंनी बंडखोरी केली आहे.

सिल्लोडमधून अब्दुल सत्तारांच्या विरोधात भाजपच्या सुनिल मिरकरांनी बंडखोरी केली आहे.

सावंतवाडी शिंदेंच्या दिपक केसरकरांविरोधात भाजपच्या विशाल परबांनी बंडखोरी केली आहे.

घनसावंगीत शिंदे गटाच्या हिमकत उढाणांविरोधात भाजपचे सतिश घाटगेंनी बंडखोरी केली आहे.

कर्जतमधून शिंदेंच्या महेंद्र थोरवेंविरोधात भाजपच्या किरण ठाकरेंनी बंडखोरी केली आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात भाजप उमेदवारांची बंडखोरी

अहेरीत दादा गटाच्या धर्मराव अत्रामांविरोधात भाजपचे अंबरिश अत्रामांनी बंडखोरी केली आहे.

अमळनेरात दादा गटाच्या अनिल पाटलांविरोधात भाजपच्या शिरिश चौधरींनी बंडखोरी केली आहे.

अमरावतीत सुलभा खोडके विरोधात भाजपचे जगदिश गुप्तांनी बंडखोरी केली आहे.

वसमतमध्ये राजू नवघरेंविरोधात भाजपचे मिलिंद एंबलांनी बंडखोरी केली आहे.

पाथरीत राजेश विटेकरांविरोधात भाजपचे रंगनाथ सोळंकेंनी बंडखोरी केली आहे.

शहापूरमधून दौलत दरोडांविरोधात रंजना उगाडांनी बंडखोरी केली आहे.

जुन्नरमध्ये अतुल बेनकेंविरोधात भाजपच्या आशा बुचकेंनी बंडखोरी केली आहे.

मावळात सुनिल शेळकेंविरोधात भाजपच्या भेगडे बंधूंनी बंडखोरी केली आहे.

उदगीरमध्ये संजय बनसोडेंविरोधात भाजपच्या दिलीप गायकवाडांनी बंडखोरी केली आहे.

कळवणमध्ये नितिन पवारांविरोधात रमेश थोरातांनी बंडखोरी केली आहे.

भाजपविरोधात शिंदेंच्या शिवसेनेची बंडखोरी

ऐरोलीत भाजपच्या गणेश नाईकांविरोधात शिंदे गटाच्या विजय चौघुलेंनी बंड केलं आहे.

बेलापूरात भाजपच्या मंदा म्हात्रेंविरोधात विजय नहाटांनी बंडखोरी केली.

कल्याण पूर्वमधुन भाजपच्या सुलभा गायकवाडांविरोधात महेश गायकवाडांनी बंडखोरी केली.

विक्रमगडमधून भाजपच्या हरिश्चंद्र भोयेंविरोधात प्रकाश निकमांनी बंडखोरी केली.

फुलंब्रीत भाजपच्या अनुराधा गायकवाडांविरोधात रमेश पवारांनी बंडखोरी केली.

सोलापूर शहर मध्यमध्ये देवेंद्र कोठेंविरोधात मनीष काळजेंनी बंडखोरी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: रिल्सचा नाद बेक्कार... चिमुकली नदीत बुडतेय अन् ती व्हिडीओ काढण्यात मग्न, मन सुन्न करणारा व्हिडीओ

IND vs AUS: टीम इंडियाला BGT जिंकायचीये तर सुनील गावसकरांचा हा सल्ला ऐकावाच लागेल

Gold Silver Rate : दिवाळीनंतर सोनं झालं स्वस्त; चांदीची चकाकी सुद्धा उतरली, आजचा भाव वाचला का?

Maharashtra Politics: कांदेंना 'कारंजा' तर धात्रक यांना 'चिमणी', डमी उमेदवारांमुळे नाशिकचे राजकारण तापलं

Maharashtra News Live Updates : उद्धव ठाकरे यांची आज रत्नागिरीत जाहीर सभा

SCROLL FOR NEXT