Airoli Assembly Constituency : नाईक कुटुंबाचा बालेकिल्ला कोण भेदणार? ऐरोलीत आमदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?

Airoli Assembly Constituency Election : गणेश नाईक यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ऐरोली विधानसभा मतदारसंघाव महायुतीमधील शिंदे गटाची नजर आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे साऱ्यांचं लक्ष असेल.
 नाईक कुटुंबाचा बालेकिल्ला कोण भेदणार? ऐरोलीत आमदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?
Airoli Assembly Constituency : नाईक कुटुंबाचा बालेकिल्ला कोण भेदणार? ऐरोलीत आमदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? Saam tv
Published On

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर ऐरोली विधानसभा मतदारसंघात महायुतीची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघातील प्रतिक्षित असलेलं दिघा रेल्वे स्टेशनही लोकांसाठी खुलं झालं आहे. या विधानसभा मतदारसंघात एकीकडे टोलेजंग इमारती आहेत. तर दुसरीकडे गरीबांचीही वस्ती मतदारसंघात आहे. नवी मुंबईतील या ऐरोली विधानसभा मतदारसंघावर महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व पक्षांची नजर आहे. तर इतर राजकीय पक्षांची ताकद फार कमी आहे. प्रमुख पक्षांच्या जागावाटपात ऐरोली विधानसभा मतदारसंघ कोणाच्या पदरात पडणार, याकडे साऱ्यांचं लक्ष असेल.

२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ऐरोलीत भाजपचे गणेश नाईक यांनी बाजी मारली होती. २०१९ साली झालेल्या निवडणुकीत गणेश नाईक यांना १,१४,६४५ इतकी मते मिळाली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश शिंदे यांना ७८,४८१ मते मिळाली होती. तर २०१४ साली झालेल्या निवडणुकीत संदीप गणेश नाईक विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेच्या लक्ष्मण चौघुले यांचा पराभव केला होता.

 नाईक कुटुंबाचा बालेकिल्ला कोण भेदणार? ऐरोलीत आमदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?
Kopri-Pachpakhadi Assembly Constituency : शिवसेना फुटीनंतर CM शिंदे गड राखणार का? मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मविआतून कोण आव्हान देणार?

ऐरोली मतदारसंघावर शिवसेनेचा दावा

मागील दोन टर्म नाईक कुटुंबाने बाजी मारलेल्या ऐरोली विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचीही नजर आहे. शिंदे गट महायुतीच्या जागावाटपात ऐरोली मतदारसंघाची मागणी करण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या मागणीमुळे भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत मताधिक्य मिळवूनही टार्गेट करण्यात आलं, असा आरोप शिंदे गटाचा आहे. तर ऐरोली विधानसभेत शिंदे गटाचे सर्वाधिक नगरसेवक असल्याचं म्हणत शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांचा दावा आहे.

 नाईक कुटुंबाचा बालेकिल्ला कोण भेदणार? ऐरोलीत आमदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?
Mumbra Kalwa : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मुंब्रा-कळव्यात जितेंद्र आव्हाडांसमोर कोणाचं आव्हान? अजित पवार गटाकडून विधानसभेची चाचपणी सुरु

ऐरोली विधानसभेवरून महाविकास आघाडीमध्ये देखील रस्सीखेच

नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघावरून आता महाविकास आघाडीमध्ये देखील रस्सीखेच पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमधून काँग्रेसने ऐरोली विधानसभेवर आपला दावा सांगितला आहे. काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग ऐरोली विधानसभेत आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्ष देखील काँग्रेसला जागा मिळाल्यास सहकार्य करतील, असा विश्वास काँग्रेसचे इच्छुक उमेदवार अनिकेत म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट देखील ऐरोली विधानसभेसाठी आग्रही आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कोणाच्या पारड्यात पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com