Devendra Fadnavis Saam tv
मुंबई/पुणे

Devendra fadnavis Exclusive interview : महायुती आणि भाजपला निवडणुकीत किती जागा मिळतील? देवेंद्र फडणवीसांनी मोजक्या शब्दात सांगितलं

Devendra Fadnavis Latest Interview : देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी महायुतीत किती जागा मिळेल, यावर देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं.

Vishal Gangurde

मुंबई : विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसहित महायुतीतील उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. या निवडणुकीत महायुतीला किती जागा मिळतील, याचे अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून मांडले जात आहेत. त्यात आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने विविध मतदारसंघातील चित्रही स्पष्ट झालं आहे. याचदरम्यान, महायुती आणि भाजपला किती जागा मिळतील, यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहं.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी बंडखोरी ते महायुतीला किती जागा मिळतील, या प्रश्नांवर उत्तरे दिली. महायुतीला किती जागा मिळतील, यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'राज्यात अनेक सर्व्हे झाले. सध्याच्या अभ्यासात किती जागा दिसतात. रोज त्या वाढतात. मी सांगितलं तर महायुतीच्या जागा मीच कमी लेखतो असं होईल. कुठलीही निवडणूक असते, ती टफ बॅटल असते. आव्हान असते. ही आव्हानात्मक आहे. असे मी मानतो. महायुतीचं सरकार येईलच अशी परिस्थिती दिसायला लागली आहे'.

राज्यातील बंडखोरीवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'महायुतीसमोर आणि महाविकास आघाडीसमोर अशा सगळ्यांसमोर बडखोरांचं आव्हान होतं. पण आम्ही बंडखोर यांनी माघार घेतले आहे. तुरळक अपवाद आहेत. काँग्रेस आघाडी आहे, त्यांची परिस्थिती तशी नाही. अनेक ठिकाणी बंडखोरी आहे. एकमेकांच्या समोर उभे आहेत. त्याचा फटका त्यांना बसेल'.

गोपाळ शेट्टी यांच्या बंडखोरीवर बोलताना फडणवीस म्हणाले, 'पहिल्या दिवसापासून एका गोष्टीची खात्री होती. अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. ते स्वभावाने थेट बोलणारे आहेत. शेवटी गोपाळ पक्ष सांगतील तेच करतील. त्यांनी ते केलं. कदाचित अपक्ष लढले असते तर निवडून आले असते. निश्चितपणे त्यांना योग्य त्या जबाबदाऱ्या दिलेल्या पाहायला मिळतील'.

'आमच्याकडे बाहेरचे लोक घेतलेले नाहीत. फार काही उमेदवारी दिलेली नाही. याउलट महाविकास आघाडीत पाहायला मिळतं. अनेक उमेदवार आमच्याच पक्षातल्यांना दिलेत. पक्षातल्यांनाच उमेदवारी देण्याकडे लक्ष दिले गेले. निवडून येण्याची शक्यता अधिक असलेल्या आपण पहिलं प्राधान्य दिले. निवडून येण्याचा निकष असल्यामुळे कधी कधी आपली चांगले लोक डावलावे लागतात. पण आम्ही जेव्हा समजावून सांगतो तेव्हा ते समजून सांगतात,असेही फडणवीसांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chalisgaon News : निकालापूर्वी चाळीसगावात झळकले विजयाचे बॅनर; आमदार चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी लावले फ्लेक्स

Salman Khan : बाप लेकाचा स्वॅग न्यारा! दबंग स्टाइलमध्ये भाईजान बसला वडिलांच्या बाईकवर, पाहा PHOTO

Exit Poll Maharashtra : दापोली विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: गोदिंयामधून भाजपचे विनोद अग्रवाल होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT