Maharashtra Politics  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचा महायुती, नारायण राणेंना मोठा धक्का; राज्यातील २ दिग्गज नेत्यांनी हाती धरली मशाल, कशी असेल लढाई?

Vishal Gangurde

मुंबई : ऐन विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी महायुती आणि नारायण राणे यांना मोठा धक्का दिला आहे. ठाकरेंनी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपला मोठा धक्का दिलाय. दोन्ही पक्षातील बड्याने नेत्यांनी ठाकरे गटाची हाती मशाल धरली आहे. या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केल्याने महायुतीला मोठा धक्का बसला आहे.

आज मुंबईत सांगोल्यातील अजित पवार गटाचे दीपक आबा साळुंखे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. तर सिंधुदुर्ग भाजपचे स्थानिक नेते राजन तेली यांनी हाती मशाल धरली. चिंचवड येथील अजित पवार गटाचे मोरेश्वर बोंडवे हे देखील ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. तिन्ही नेते मशाल हाती धरत असल्याने ऐन विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसताना दिसत आहे.

राजन तेली यांच्या पक्ष प्रवेशामुळे कोकणात भाजपसोबतच नारायण राणेंना ठाकरेंचा धक्का केला आहे. सावंतवाडीतून दीपक केसरकर यांच्या विरोधात राजन तेली यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर सांगोल्यातील दीपक आबा साळुंखे यांचाही पक्षप्रवेश झाला आहे. त्यामुळे महायुतीला सांगोल्यातही फटका बसण्याची शक्यता आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

दोन्ही दिग्गज नेत्यांच्या पक्षप्रवेशावेळी संजय राऊत म्हणाले, 'सांगोल्यात गद्दाराच्या छाताडावर पाय रोवून हातात मशाल घेऊन विजय होणार आहे. एका गद्दाराला महाराष्ट्रातील झाडे डोंगर दिसले नाहीत. दुसऱ्या राज्यातलं झाडे डोंगर दिसलं. त्याच झाडाच्या मुळाखाली त्याला गाडायचे आहे. आबा कार्यक्रम फिट करण्यासाठी आहे. आम्हाला खात्री आहे की, आबा आणि चाहत्यांना आणि संगोल्याला गर्व वाटेल, असे निर्णय उद्धव ठाकरे घेतील. आमदार म्हणून विजय होतील आणि नेतृत्व मंडळात संधी मिळेल. गद्दारांना गाडण्यासाठी मशाल रोवायला पाहिजे, याचा निश्चय करू'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शरद पवार गटाची सोमवारी ८० उमेदवारांची यादी जाहीर होणार

Maharashtra Politics: ठाकरे-काँग्रेसचं फाटलं? पत्रकार परिषदेत मविआतला विसंवाद चव्हाट्यावर; VIDEO

Sillod Politics : सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांची एकाहाती सत्तार कोण भेदणार? महाविकास आघाडीकडून कोणाची तयारी? वाचा सविस्तर

VIDEO : अजित पवारांचा शिंगणे यांना फोन; नाराजी दूर करण्याचा अजितदादांचा प्रयत्न

Virat Kohli Record : रनमशीन कोहलीचा 'विराट' रेकॉर्ड; थेट तेंडुलकर-गावसकर क्लबमध्ये एन्ट्री

SCROLL FOR NEXT