Maharashtra Politics SAAM Digital
मुंबई/पुणे

Maharashtra Election : मोठी बातमी! विधानसभेसाठी भाजपने मित्रपक्षांना सोडल्या ४ जागा, कुणाला केला पाठिंबा जाहीर?

Maharashtra Assembly Election : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी हाती आली आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी मित्रपक्षांना ४ जागा सोडल्या आहेत.

Vishal Gangurde

मुंबई : विधासनभा निवडणुकीसाठी महायुतीतील प्रमुख भाजप पक्षाने कंबर कसली आहे. भाजपने आतापर्यंत राज्यात १४६ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर भाजपने त्यांच्या कोट्यातून ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या आहेत. भाजपने ४ जागा सोडून मित्रपक्षांची नाराजी दूर केल्याचं बोललं जात आहे.

भाजपने ४ जागा सोडल्याने महायुतीच्या जागावाटपात १५० जागा मिळाल्याचं बोललं जात आहे. महायुतीचा जागावाटपाचा अधिकृत फॉर्म्युला समोर आलेला नाही. भाजपने राज्यात मित्रपक्षांना एकूण चार जागा सोडल्या आहेत. भाजपने अमरावतीच्या बडनेरामध्ये रवी राणा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तर गंगाखेडमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या रत्नागर गुट्टे यांना समर्थन जाहीर केलं आहे. तर मुंबईतील कलिना विधानसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला सोडला आहे. त्याचबरोबर भाजपने शाहूवाडीतून जनसुराज्य शक्ती पक्षाच्या विनय कोरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने आज सोमवारी तिसरी यादी जाहीर केली. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास ४ मित्रपक्षांना जागा सोडल्या. भाजपने पहिल्या यादीत ९९ उमेदवार जाहीर केले. त्यानंतर दुसऱ्या यादीत २२ उमेदवार जाहीर केले. त्यानंतर सोमवारी २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केले. त्याचदिवशी भाजपने मित्रपक्षांना ४ जागा सोडल्या. भाजपने युवा स्वाभिमानी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपाईं, जनसुराज्य शक्ती पक्ष या पक्षांना जागा सोडल्या.

बडनेरा विधानसभा मतदारसंघात महायुती बंडखोरी

भाजपने रवी राणा यांना पाठिंबा जाहीर करत भाजप नेत्याची उमेदवारी नाकारली आहे. भाजप नेते तुषार भारतीय यांची उमेदवारी नाकारली. यामुळे तुषार भारतीय अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आमदार रवी राणा यांना भाजपने पाठिंबा दिल्याने तुषार भारतीय नाराज झाले आहेत. त्यामुळे तुषार भारतीय भाजपमधून बंडखोरी करणार आहेत. बडनेरा मतदारसंघात भाजपकडून तुषार भारतीय इच्छुक होते. आता बडनेरा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार रवी राणा असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahisar Exit Poll : दहिसर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? घोसळकर भाजपला धक्का देणार का?

President's Rule : 26 तारखेला राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागेल का? अनंत कळसेंनी काय सांगितलं, पाहा VIDEO!

Kankavli Exit Poll: राणेंच्या वर्चस्वाला सुरुंग लागणार का? कणकवलीचा एक्झिट पोल काय सांगतो?

Maharashtra Exit Poll : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभेवर जाणार का? एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो?

Saam Exit Poll : ठाकरे गटाची तोफ धडाडणार? गुहागर कोण जिंकणार? एक्झिट पोलचा अंदाज आला

SCROLL FOR NEXT