Sana Malik : अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा..; नवाब मलिकांची कन्या सना यांचा स्वरा भास्करवर निशाणा

Sana Malik on Swara Bhaskar : सना मलिक यांनी फहाद अहमद आणि स्वरा भास्कर यांच्यावर निशाणा साधलाय. त्या अणुशक्तीनगरमधील महायुतीच्या उमेदवार आहेत.
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा..; नवाब मलिकांची कन्या सना यांचा स्वरा भास्करवर निशाणा
Sana Malik Saam tv
Published On

मुंबई : महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांची कन्या सना मलिक या अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत उतरल्या आहेत. आज सना मलिक यांनी आज सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांचे वडील नवाब मलिक आणि त्यांची मोठी बहीण उपस्थित होती. यावेळी त्यांनी फहाद अहमद आणि स्वरा भास्कर यांच्यावर निशाणा साधला.

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात सना मलिक यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून फहाद अहमद मैदानात उतरले आहेत. याआधी फहद अहमद समाजवादी पक्षात होते. त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे माजी विद्यार्थी आहेत.फहाद यांनी सीएए-एनआरसी आणि एनपीआर सारख्या आंदोलनात प्रामुख्याने सहभाग नोंदवला होता. त्यांनी अभिनेत्री स्वरा भास्करसोबत १६ फेब्रुवारी २०२३ साली लग्न केलं.

सना यांनी फहाद यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं की, 'नवाब मलिक यांची मुलगी असण्याचा गर्व आहे. जर नवाब मलिकांची मुलगी ही अणुशक्तीनगरची मुलगी होत असेल, तर एखाद्या अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा चांगलं आहे. मला लोकांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे'.

अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा..; नवाब मलिकांची कन्या सना यांचा स्वरा भास्करवर निशाणा
Maharashtra Politics: माघारीसाठी दबाव आणि धमक्या, पण मी लढणारच; सदा सरवणकर निर्णयावर ठाम

सना मलिक पुढे म्हणाल्या,'मागच्या निवडणुकीत वडिलांसाठी काम केलं. पण त्यानंतर सतत ५ वर्ष या मतदारसंघात फिरत आहे. प्रत्येक घरात प्रत्येक गल्लीत जाऊन लोकांना भेटले आहे. फहाद अहमद हा पॅराशूटने पक्षात आला. त्याला पॅराशूट उमेदवारी मिळाली. या भागात मेट्रो होत आहे. हा विकास नाही का? महाविकास आघाडीतील नेत्यांनी आम्हाला कठीण काळात मदत केली, मी त्यांची आभारी आहे. पण अजित पवारांनी मला कायम संभाळून घेतलं. प्रत्येक अडचणी त्यांनी सोडवल्या.

'महायुतीच्या इतर पक्षाचं आम्हाला माहिती नाही. आम्ही अजित पवारांसोबत आहोत. भाजपासोबत जाणं ही जागांची राजकीय सोय आहे. पुढील २४ तासांत नवाब मलिक यांच्या बद्दलची सगळी उत्तर मिळतील, असे ते म्हणाले.

अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा..; नवाब मलिकांची कन्या सना यांचा स्वरा भास्करवर निशाणा
Maharashtra Political News: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपद न देण्याचं आधीच ठरलं होतं; बड्या आमदाराचा गौप्यस्फोट

सना यांच्या उमेदवारीवर नवाब मलिक काय म्हणाले?

नवाब मलिक म्हणाले,'आमच्या कठीण काळात अजित पवारांनी आम्हाला साथ दिली. मी त्यांचा आभारी आहे. मला आनंद आहे की माझ्या मुलीला उमेदवारी मिळाली. आज मी तिच्यासाठी आलो आहे. मी उदया अर्ज भरणार आहे, त्यानंतर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. समाजवादी पक्ष आणि अबू आझमी हे शिवाजीनगरमध्ये ड्रग्जचा धंदा करतात. माझ्या अणुशक्तीनगरमध्ये सुद्धा त्यांनी हा धंदा करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर कारवाई झाली आहे.

'फहाद अहमद हा कधी मुंबईत आला? त्याला मुंबई माहिती आहे का? मी अजित पवारांसोबत आहे. मला इतरांचं माहिती नाही. समीर वानखेडे यांच्या संदर्भात योग्य कारवाई सुरू आहे. लवकरच त्यांची नोकरी जाईल. मानखुर्द-शिवाजीनगर आणि अणुशक्ती नगरमधील आमचाच विजय होईल, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com