Nawab Malik : अजित पवारांची मनधरणी अपयशी; नवाब मलिक निवडणूक लढण्यास ठाम, कुठून भरणार अर्ज? VIDEO

Nawab Malik News : नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगरमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. याबाबत राष्ट्रवादीकडून उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे.
Nawab Malik News
Nawab MalikSaam tv
Published On

मुंबई : महाविकास आघाडी आणि महायुतीने राज्यातील जवळपास मतदारसंघावर उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, दोन्ही आघाड्यांनी मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. या विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार अबू आझमी आहेत. ते आता पुन्हा या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, महाविकास आघाडीचा या जागेवरचा तिढा कायम आहे. दुसरीकडे महायुतीनेही या जागेवर उमेदवार जाहीर केलेला नाही.

नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध असल्याची चर्चा आहे. याचदरम्यान, नवाब मलिक घडाळ्याच्या चिन्हावर विधानसभा लढण्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Nawab Malik News
Sharad Pawar NCP 2nd Candidate List : शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर; छगन भुजबळ यांच्या विरोधात दिला तगडा उमेदवार, वाचा संपूर्ण यादी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज नवाब मलिकांची भेट घेतली. विधानसभा निवडणूक पक्षातर्फे लढवण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. नवाब मलिक यांच्याबाबत पक्षाकडून उद्या महत्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर नवाब मलिक हे येत्या मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, आज नवाब मलिक यांच्या भेटीसाठी अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ पोहोचले होते. नवाब मलिक हे शिवाजीनगर-मानखुर्द विधानसभेमधून अपक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. पण यंदाची विधानसभेची निवडणूक लढवू नका, अशी विनंती करण्याकरिता नेतेमंडळी आज नवाब मलिक यांच्या भेटीला आले होते.

Nawab Malik News
BJP Candidate Second list : भाजपची दुसरी यादी जाहीर; कुणाला मिळालं विधानसभेचं तिकीट?

नवाब मलिकांच्या घरी अजित पवार,प्रफुल्ल पटेल,छगन भुजबळ आणि नवाब मलिक यांची बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीत नवाब मलिक यांना इतर नेत्यांकडून निवडणूक लढवू नका, अशी विनंती करण्यात आली. पण मलिक निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना अणुशक्तीनगर या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकिट जाहीर झाल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com