Sharad Pawar NCP 2nd Candidate List : शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर; छगन भुजबळ यांच्या विरोधात दिला तगडा उमेदवार, वाचा संपूर्ण यादी

NCP sharad pawar group 2nd Candidate List : शरद पवार गटाची दुसरी यादी समोर आली आहे. शरद पवार गटाने छगन भुजबळ यांच्या तगडा उमेदवार दिला आहे.
sharad pawar
Sharad Pawar Saam Tv
Published On

सुनील काळे, साम टीव्ही

मुंबई : शरद पवार गटाने दुसरी यादी जाहीर केली. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची दुसरी यादी जाहीर केली. जयंत पाटील यांनी आता एकूण २२ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे शरद पवार गटाने आतापर्यंत एकूण ६७ उमेदवार जाहीर केले आहेत. या यादीत बीडमध्ये संदीप क्षिरसागर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर उल्हासनगरमधून ओमी कलानी यांना उमेदारी मिळाली आहे.

छगन भुजबळ यांच्या विरोधात तगडा उमेदवार रिंगणात

नाशिकच्या येवला मतदारसंघातून शरद पवार गटाकडून माणिकराव शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. एकेकाळी भुजबळांचे कट्टर समर्थक असलेल्या आणि शरद पवारांचे समर्थक असलेल्या माणिकराव शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने येवला-लासलगाव मतदारसंघात मोठी चुरस निर्माण होणार आहे. माणिकराव शिंदे यांनी २०१४ साली शिवसेनेकडून छगन भुजबळ यांच्याविरोधात निवडणूक लढली होती. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता.

sharad pawar
Thackeray Group 1st List: CM शिंदेंविरोधात दिघेंना उमेदवारी, ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली संधी? वाचा...

पुढे छगन भुजबळ यांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर माणिकराव शिंदे यांनी शरद पवारांना साथ दिली. त्यानंतर शरद पवारांनी नाशिकच्या येवल्यात पहिली सभा घेतली होती. येवल्यात ७ जण महाविकास आघाडीकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. शेवटच्या क्षणाला महाविकास आघाडीकडून माणिकराव शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

शरद पवार गटाची दुसरी यादी

1. एरंडोल - सतीश अण्णा पाटील

2. गंगापूर - सतीश चव्हाण

3. शहापूर - पांडुरंग बरोरा

4. परांडा - राहुल मोटे

5. बीड - संदीप क्षीरसागर

6. आर्वी - मयुरा काळे

7. बागलान - दीपिका चव्हाण

8. येवला - माणिकराव शिंदे

9. सिन्नर - उदय सांगळे

10. दिंडोरी - सुनीता चारोस्कर

11. नाशिक - पूर्व गणेश गीते

12. उल्हासनगर - ओमी कलानी

13. जुन्नर - सत्यशील शेरकर

14. पिंपरी- सुलक्षणा शीलवंत

15. खडकवासला - सचिन दोडके

sharad pawar
Ajit Pawar Candidate List: ब्रेकिंग! अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर; बारामतीचा सामना ठरला; ३८ जणांची नावे

16. पर्वती - अश्विनीताई कदम

17. अकोले - अमित भांगरे

18. अहिल्या नगर शहर - अभिषेक कळमकर

19. माळशिरस - उत्तमराव जानकर

20. फलटण - दीपक चव्हाण

21. चंदगड - नंदिनीताई भाबुळकर कुपेकर

22. इचलकरंजी - मदन कारंडे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com