Mahavikas Aghadi Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : महाविकास आघाडीचं ठरलं, स्ट्राईक रेटवर अडलं? काँग्रेसचा फॉर्म्युला ठाकरे-पवार स्वीकारणार का? पाहा व्हिडिओ

Maharashtra Political news : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने जागावाटपासाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप नेमकं कुठं अडलं, याची माहिती समोर आली आहे.

साम टिव्ही

भरत मोहोळकर, साम टीव्ही

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटपावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु आहे. त्यातच महाविकास आघाडीत स्ट्राईक रेटच्या निकषाचा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे या निकषाचा फायदा कुणाला होणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

विधानसभा निवडणूक तोंडावर आलीय. त्यातच महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चांनी जोर धरायला सुरुवात केलीय. तर लोकसभेला 13 जागा जिंकल्याने आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसने जागा वाटपासाठी स्ट्राईक रेट या निकषानुसार विधानसभेला 110 ते 120 जागांवर तयारी सुरु केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

दुसरीकडे लोकसभेला महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाचा स्ट्राईक रेट किती होता पाहूयात....

लोकसभेला ठाकरे गटाने 21 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 9 जागांवर विजय तर त्यांचा स्ट्राईक रेट 43 टक्के आहे. तर काँग्रेसने 17 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 13 जागांवर विजय तर त्यांचा 76% स्ट्राईक रेट आहे. शरद पवारांच्या पक्षाने 10 जागा लढवल्या. त्यापैकी 8 जागांवर विजय तर त्यांचा 80% स्ट्राईक रेट इतका आहे.

महायुतीत सर्वाधिक स्ट्राईक रेट असलेल्या शिंदे गटाने स्ट्राईक रेट जागा वाटपाची चर्चा व्हावी, असं अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलंय. त्यामुळे की काय मविआतही स्ट्राईक रेटच्या निकषावर जोरदार चर्चा रंगू लागलीय. मविआत सर्वाधिक स्ट्राईक रेट पवारांच्या राष्ट्रवादीचा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी 85 ते ९० जागा लढवण्यावर आग्रही असल्याची माहिती आहे. मविआत स्ट्राईक रेटच्या निकषाचा सर्वाधिक फटका ठाकरेंच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस या निकषावर आग्रही असली तरी ठाकरेंना हा निकष मान्य होणार यावर जागावाटपाचं समीकरण अवलंबून आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk Rice Benefits: दूध भात खाण्याचे फायदे काय?

Garlic pickle: घरच्या घरी तयार करा लसणाचे स्वादिष्ट लोणचे

ICC Cricket: पाकिस्तानच्या नकोशा विक्रमाची पुनरावृत्ती, 'या' ६ फलंदाजाला खातेही उघडता आले नाही, कोणत्या संघाच्या नावावर लाजिरवाणा विक्रम?

Blood Sugar Level Tips: औषधांशिवाय ब्लड शुगर लेवल कमी करायचीये? घरच्या घरी करा सोपे उपाय

KL Rahul Wicket: अर्रर्रर्रर्र....! चेंडू सोडला अन् बेल्स उडाल्या, केएल राहुलची विचित्र विकेट

SCROLL FOR NEXT