Maha Vikas Aghadi Seat Allocation  Saam Digital
मुंबई/पुणे

Lok sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर महाविकास आघाडीची महत्वाची बैठक; 'वंचित'च्या भूमिकेवर काय निर्णय घेणार?

Maha vikas Aghadi seat sharing meeting : ठाकरे गटाने उद्या मंगळवारी 'सामना'तून उमेदवारांची घोषणा करणार असल्याचे जाहीर केले आहे. याआधीच महाविकास आघाडीने 'मातोश्री'वर बैठक आयोजित केली आहे.

Vishal Gangurde

सूरज मसुरकर, गिरीश कांबळे, मुंबई

Maha vika aghadi Latest News :

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील काँग्रेसने काही जागांवरील उमेदवारी जाहीर केली आहे. आतापर्यंत ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार यांनी एकही लोकसभेच्या उमेदवारांची जाहीर केलेली नाही. ठाकरे गटाने उद्या मंगळवारी 'सामना'तून उमेदवारांची घोषणा करणार असल्याचे जाहीर केले आहे. याआधीच महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान 'मातोश्री'वर महत्वाची बैठक आयोजित केली आहे. (Latest Marathi News)

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी आज सोमवारी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत शरद पवार हे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी ही बैठक पार पडेल.

गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये अनेक जागांचा तिढा कायम आहे. याच जागांवर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज सोमवारी पुन्हा एकदा संध्याकाळी बैठक आहे. या बैठकीला शरद पवार यांच्यासह संजय राऊत आणि इतर प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत.

दरम्यान, ठाकरे गटाकडून १५ ते १६ उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला दिलेला अल्टिमेटम आज संपत आहे. प्रकाश आंबेडकर उद्या त्यांची महाविकास आघाडीबाबतची भूमिका स्पष्ट करणार आहे. याबाबतही महाविकास आघाडीकडून चर्चा होण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाला मिळणाऱ्या संभाव्य जागा आणि संभाव्य उमेदवार

१-जळगाव - ?

२-बुलढाणा - नरेंद्र खेडेकर

३-यवतमाळ वाशीम - संजय देशमुख

४-हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर

५-परभणी - संजय जाधव

६-छत्रपती संभाजीनगर - चंद्रकांत खैरे

७-धाराशिव - ओमराजे निंबाळकर

८-शिर्डी - भाऊसाहेब वाकचौरे

९-नाशिक - विजय करंजकर

१०-ठाणे - राजन विचारे

११-कल्याण - ?

१२-पालघर - ?

१३-मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य) - संजय दिना पाटील

१४-मुंबई दक्षिण - अरविंद सावंत

१५-मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई

१६-मुंबई उत्तर पश्चिम - अमोल कीर्तिकर

१७-उत्तर मुंबई - ?

१८-रत्नागिरी सिंधुदुर्ग - विनायक राऊत

१९-रायगड - अनंत गीते

२०-सांगली - चंद्रहार पाटील

२१-हातकणंगले (स्वाभिमानी संघटनेला बाहेरून पाठिंबा )

२२- मावळ - संजोग वाघेरे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur News :...तर अधिकाऱ्यांना घरी पाठवणार; बदलापुरात वीजपुरवठा आणि पाणीपुरवठ्यावरून शिंदे गट आक्रमक

Dhule News: अवैधपणे गर्भपात करण्यासाठी औषध विक्री करणाऱ्या डॉक्टरचा भांडाफोड

Ghanshyam Darode: बदनामी करणाऱ्यांवर करावाई करा; नाहीतर आत्मदहन करेन, घनश्याम दरोडेचा इशारा

Weakness: सतत थकवा जाणवतोय, असू शकतं 'हे' गंभीर आजार

Holiday : ७ जुलैला मिळणार सार्वजनिक सुट्टी! शाळा, बँका, बाजार… काय बंद राहणार?

SCROLL FOR NEXT