सचिन बनसोडे, शिर्डी|ता. २५ मार्च २०२४
लोकसभेच्या जागा वाटपावरुन महायुतीमध्ये सध्या कलगीतुरा पाहायला मिळत आहे. जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना इच्छुकांमध्ये नाराजीनाट्यही पाहायला मिळत आहे. अशातच आता शिर्डी लोकसभेवर शिवसेना शिंदे गटाने दावा ठोकला असून पुन्हा मिच उमेदवार असल्याचे सांगत शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)
शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी आज महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा होणार आहे. त्या दौऱ्यानिमित्ताने ही बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर महायुतीकडून पुन्हा मिच शिर्डी लोकसभेला उमेदवार असल्याचा दावा सदाशिव लोखंडे यांनी केला.
"शिर्डी लोकसभेसाठी शंभर टक्के मीच उमेदवार असणार आहे. तुपामध्ये पैसे खाणारा खासदार पाहिजे का? हे जनतेने ठरवायचे आहे. त्यांची प्रशासकीय सेवेत 32 वर्षे सर्विस झाली आहे माझी जनतेत सर्विस झाली आहे. त्यामुळे मी त्यांच्यापेक्षा बरा आहे," असे म्हणत खा. सदाशिव लोखंडे यांची ठाकरे गटाचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर टिका केली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मला कामाला लागा असे सांगितले आहे. महायुतीने कुणालाही तिकीट दिले तरी काम करू. 2014 आणि 2019 ला उध्दव साहेबांनी मदत केली, मात्र आता मी शिंदेसाहेबांसोबत आहे. प्रस्थापितांबरोबर काही मतभेत असू शकतात. मात्र आमच्यात वाद नाही, असेही खासदार लोखंडे यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.