Nashik : येवला शहरात भीषण स्थिती, पाण्यासाठी महिला आक्रमक; डोक्यावर उलटा हंडा ठेवत प्रभागातून काढला माेर्चा

Yeola Water Scarcity News : सध्या रमजान महिना सुरु आहे. रोजे (उपवास) सोडण्यासाठी सुध्दा पाणी मिळत नसल्याने महिला संतप्त झाल्या आहेत.
water scarcity in yeola
water scarcity in yeolasaam tv

- अजय सोनवणे

Nashik :

नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातील मूलतानपूरा भागात गेल्या दहा दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्याने महिला आक्रमक झाल्या आहेत. या भागातील महिलांनी आज (साेमवार) डोक्यावर उलटे हंडे ठेवत प्रभागातून पालिकेच्या विराेधात फेरी काढली. यावेळी महिलांनी नगरपरिषद प्रशासनाचा तीव्र शब्दांत निषेध नाेंदविला. (Maharashtra News)

सध्या रमजान महिना सुरु आहे. रोजे (उपवास) सोडण्यासाठी सुध्दा पाणी मिळत नसल्याने महिला संतप्त झाल्या आहेत. त्यांनी हंडे वाजवत आपला तीव्र संताप व्यक्त केला. आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे साठवण तलावातील पाणी संपुष्टात आलेले आहे.

water scarcity in yeola
Ramadan 2024 News: मालेगाव, बीडमध्ये विदेशी खजूर खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची गर्दी, जाणून घ्या पेंडखजूरचा भाव

येवला शहराला पाचव्या दिवशी पाणी येते. त्यातच मुलतानपूरा भागात दहा दिवस झाले तरी पाणीपुरवठा झालेला नाही. यामुळे महिलांनी नगर पालिका विरोधात आपला रोष उलडे हंडे घेत माेर्चा काढून व्यक्त केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

water scarcity in yeola
Ambenali Ghat Accident News : आंबेनळी घाटात भीषण अपघात, 400 फूट दरीतून मदत कार्य सुरु; अपघातस्थळी पर्यटकांची गर्दी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com