Ambenali Ghat Accident News : आंबेनळी घाटात भीषण अपघात, 400 फूट दरीतून मदत कार्य सुरु; अपघातस्थळी पर्यटकांची गर्दी

mahabaleshwar latest marathi news : थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वराची ख्याती असून सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वरात सध्या पर्यटकांची गर्दी आहे.
mahabaleshwar accident
mahabaleshwar accidentsaam tv

Satara :

महाबळेश्वरातील आंबेनळी घाटात (ambenali ghat) एका माल वाहतुक गाडी 400 फूट दरीत आज (साेमवार) काेसळली. या वाहनाचा अपघात झाल्याचे समजताच महाबळेश्वर ट्रेकर्सने घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामधील दाेन्ही प्रवासी सुखरुप आहेत. एकास दरीतून बाहेर काढले असून दुस-याला लवकरच बाहेर काढू असा विश्वास महाबळेश्वर ट्रेकर्सने प्रशासनास दिला आहे. (Maharashtra News)

महाबळेश्वरहून प्रतापगडला जाताना आंबेनळी घाटात चार चाकी गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन 400 फूट खोल दरीत काेसळले. या वाहनात चालकासह दोघे जण हाेते. यामधील एका प्रवाशाला दरीतून काढण्यात महाबळेश्वर ट्रॅकर्सला यश आले आहे.

mahabaleshwar accident
Dehu Tukaram Maharaj Beej Sohala : श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त आजपासून देहू, तळवडे, चाकण परिसरातील वाहतुकीत बदल

दुसऱ्या प्रवाशाला दरीतून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान गाडी चारशे फूट खोल दरीत गेल्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. यामधील एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वराची ख्याती असून सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वरात सध्या पर्यटकांची गर्दी आहे. अपघातस्थळी पर्यटक थांबून नेमकं काय झाले याची माहिती घेताना दिसत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

mahabaleshwar accident
Madha Lok Sabha Election 2024 : 'माढा'त शिवसेनेचा विराेध मावळला, रणजितसिंह नाईक निंबाळकर शिवसैनिकांच्या 'या' अपेक्षा पूर्ण करणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com