Madha Lok Sabha Election 2024 : 'माढा'त शिवसेनेचा विराेध मावळला, रणजितसिंह नाईक निंबाळकर शिवसैनिकांच्या 'या' अपेक्षा पूर्ण करणार?

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा लाेकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर आणि विजयसिंह माेहिते पाटील या महायुतीमधील दाेन गट अद्यापही नाराज आहेत.
kurduwadi shivsena supports ranjitsinh naik nimbalkar in madha lok sabha constituency
kurduwadi shivsena supports ranjitsinh naik nimbalkar in madha lok sabha constituencysaam tv
Published On

Madha Lok Sabha Constituency :

माढा लाेकसभा मतदारसंघातील (madha lok sabha constituency) कुर्डुवाडी येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या शिवसैनिकांनी महायुतीचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर (bjp mp ranjitsinh naik nimbalkar) यांच्या विजयासाठी दिवस रात्र करण्याचे निश्चित केले आहे. कुर्डुवाडी शिवसैनिकांनी नाराजीतून आयाेजिलेल्या शिवसेनेचा निर्धार मेळाव्यातच शिवसैनिकांनी निर्णय घेताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून काही अपेक्षा असल्याचे म्हटले आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचा मेळावा जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत रविवारी झाला. या मेळाव्यात महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला.

kurduwadi shivsena supports ranjitsinh naik nimbalkar in madha lok sabha constituency
Dehu Tukaram Maharaj Beej Sohala : श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त आजपासून देहू, तळवडे, चाकण परिसरातील वाहतुकीत बदल

माढा तालुक्यातील विकासाची कामे तसेच कुर्डूवाडी मधील रेल्वे उड्डाण पुल, रेल्वे कारखाना सुरू रहावा यासाठी पाठपुरावा करून हे प्रश्न सोडविण्याचे वचन महायुतीच्या उमेदवाराने (रणजितसिंह नाईक निंबाळकर) द्यावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. या मेळाव्यातील निर्णयामुळे कुर्डूवाडीतील शिवसैनिकांचा खासदार निंबाळकर यांच्याबाबतीमधील विराेध मावळल्याचे चित्र आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

kurduwadi shivsena supports ranjitsinh naik nimbalkar in madha lok sabha constituency
Karanjali Ghat Traffic Update : करंजाळी घाटात दाेन्ही बाजूची वाहतुक ठप्प, पाच तासांपासून बंद पडलेला ट्रक हटविण्याची कार्यवाही सुरु

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com