Uddhav Thackeray, Sharad Pawar Saam Digital
मुंबई/पुणे

Maharashtra Lok Sabha 2024: सभेला उत्तर सभेने! महाविकास आघाडी एकजुटीने मैदानात; आज पुण्यात जाहीर सभा

Mahavikas Aghadi Sabha: महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शरद पवार, उद्धव ठाकरे आज पुण्यातील वारजे येथे जाहीर सभा घेणार आहेत.

Satish Daud

Pune Mahavikas Aghadi Sabha

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता. २९) पुण्यात जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. या टीकेला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आज पुण्यात जाहीर सभा घेणार आहे.

पुण्यातील वारजे येथील आर. एम. डी. कॉलेजच्या मैदानात सायंकाळी ५ वाजता सभेला सुरुवात होईल. या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.

या सभेसाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

"महाराष्ट्र हा भटकत्या आत्म्यांचा शिकार झालाय. या आत्मा स्वत:चं काम पूर्ण झालं नाही तर इतरांचं देखील काम बिघडवतात", अशी टीका नरेंद्र मोदींनी नाव न घेता शरद पवारांवर केली होती. तर "छत्रपती शिवरायांच्या भूमीत जे औरंगजेबाला मानतात अशा लोकांशी उद्धव ठाकरेंनी हातमिळवणी केली आहे".

"नकली शिवसेना या सगळ्या अजेंड्यात काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून चालते आहे. बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा तळतळत असेल. जे काही कारनामे चालले आहेत, ते पाहून त्यांच्या आत्म्याला यातना होत असतील", असं म्हणत मोदींनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

याशिवाय मोदींनी राहुल गांधींच्या 'गरीबी कशी हटवणार खटाखट-खटाखट' या शब्दांवर देखील जोरदार टीका केली होती. दरम्यान, मोदींच्या या टीकेला महाविकास आघाडीचे नेते कसे प्रत्युत्तर देतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT