Maharashtra Election: नाशकातून शिंदे गटाने तिकीट दिल्याचा दावा; कोण आहेत शांतीगिरी महाराज?

Shantigiri Maharaj : शांतीगिरी महाराजांनी अचानक शिंदे गटाकडून उमेदवारी दाखल केल्याची घोषणा केली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यामुळे शिंदे गटातही खळबळ उडाली आहे.
Maharashtra Election: नाशकातून शिंदे गटाने तिकीट दिल्याचा दावा; कोण आहेत शांतीगिरी महाराज?
Shantigiri Maharaj you tube
Published On

Shantigiri Maharaj Nashik Constituency : नाशिक लोकसभेच्या एक मोठा ट्विस्ट आलाय. नाशिकमधून शांतिगिरी महाराजांनी शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज भरलाय. मात्र त्यांना पक्षाकडून AB फॉर्म मिळालेला नाही. तीन मेपर्यंत AB फॉर्म जमा करा असे आदेश नाशिकच्या जिल्हाधिका-यांनी शांतिगिरी महाराजांना दिलेत. दरम्यान आपल्या उमेदवारी अर्जावर शिंदे गटाचे नाव भरणाऱ्या शांतिगिरी महाराजांनी आपली शिंदेंसोबत चर्चा झाली नसल्याचं म्हटलंय. आपली फडणवीसांसोबत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलंय. दरम्यान शांतीगिरी महाराजांच्या दाव्यानंतर नाशिकमध्ये खळबळ उडालीय. याचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून.

नाशिक लोकसभेच्या जागेसाठी महायुतीत रस्सीखेच सुरु असतानाच शांतीगिरी महाराजांनी सगळ्यांनाच धक्का दिला. नाशिकच्या गोदाघाट परिसरात शांतीगिरी महाराजांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज भरल्याचा सांगून महायुतीची दांडी गूल केली आहे.

शांतीगिरी महाराजांनी अचानक शिंदे गटाकडून उमेदवारी दाखल केल्याची घोषणा केली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यामुळे शिंदे गटातही खळबळ उडाली. मात्र दोन दिवसांपूर्वी शांतीगिरी महाराजांची भेट घेणाऱ्या अजय बोरस्ते यांनी अफवा न पसरवण्याचा सल्ला महाराजांना दिलाय. तर शिंदेंनी महाराजांना फार्म भरायला सांगितलाच नसल्याचं स्पष्टीकरण दीपक केसरकरांनी दिलंय.

या गोंधळानंतर छगन भुजबळ यांनी शिंदे, फडणवीस, अजित पवार जागेचा निर्य़ण घेतील असं स्पष्ट केलंय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या जागेवर बोलणंच टाळलंय. अयोध्येत योगी खासदार आहेत. त्याच धर्तीवर नाशिकच्या देवभूमीतही साधू महंतांना खासदारकी मिळावी अशी शांतीगिरी महाराजांची भूमिका आहे.

कोण आहेत शांतीगिरी महाराज

शांतीगिरी महाराज हे जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी आहेत. २००४ ला इलाहाबादमधील कुंभमेळ्यात महामंडलेश्वर पदवी मिळाली. २००९ मध्ये संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती.. या निवडणुकीत १ लाख ४२ हजार मतं मिळवून तिसऱ्या क्रमांकावर होते. शांतिगिरी महाराजांचं व्यसनमुक्ती, शेती आणि शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान आहे.. राज्यातील १३ ते १४ जिल्ह्यात जय बाबाजी भक्त परिवार सक्रीय आहे.

नाशिकच्या जागेवरून महायुतीत सुरु असलेली धुसफूस शांतीगिरी महाराजांनी हेरली. हीच संधी साधून त्यांनी शिंदें गटाकडून अर्ज भरल्याचा बॉम्ब टाकला आणि सगळ्यांनाच खडबडून जाग आलीय. या सर्व अफवा असल्याचं सांगून शिंदे गटाने तुर्तास वे मारून नेलीय..मात्र महायतीने जागेचा तिढा लवकरच सोडवला नाही तर. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचाच फायदा होणार हे मात्र नक्की.

Maharashtra Election: नाशकातून शिंदे गटाने तिकीट दिल्याचा दावा; कोण आहेत शांतीगिरी महाराज?
LokSabha Election 2024 : शांतीगिरी महाराज पुन्हा लोकसभेच्या रिंगणात; नाशिकमध्ये स्वतः उमेदवारी केली जाहीर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com