Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी अकलूजमध्ये माढ्याचे उमेदवार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्यांनी मोहिते पाटील घराणे आणि शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. उपकाराची आठवण करुन देत फडणवीसांनी मोहिते-पाटलांवर निशाणा साधलाय. पाहूया एक रिपोर्ट.
 Devendra Fadnavis warns Dhairyasheel Mohite Patil
Devendra Fadnavis warns Dhairyasheel Mohite Patil Saam TV

Maharashtra Election Devendra Fadnavis warns Dhairyasheel Mohite Patil : राज्यामध्ये बारामती एवढीच चुरस माढा मतदारसंघामध्ये पहायला मिळतेय. रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी दिल्यानं धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले आणि ही नाराजी दूर करण्यात भाजपला अपयश आलं. खुद्द संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी अकलुजला धाव घेत मोहिते पाटलांची मनधरणी केली मात्र त्याला यश आलं नाही.

अखेर धैर्यशील यांनी भाजपला रामराम करत शरद पवारांना साथ देत तुतारी हाती घेतली आहे. धैयशील मोहिते यांचं बंड हा मोठा धक्का भाजपला असतानाच उत्तमराव जानकर यांनीही शरद पवारांना साथ देण्याचं जाहीर केलं. या सर्व घडामोडींवर देवेंद्र फडणवीसांनी अकलुजच्या सभेत भाष्य केलंय. शरद पवारांनी बाजूला केल्यानंतर मोहिते पाटलांना भाजपनं आधार दिला. त्यांच्यावर विश्वास टाकला, याची आठवण फडणवीसांनी करुन दिली.

अकलूजमध्ये फडणवीसांच्या स्वागतासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुपूत्र आणि भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील उपस्थित होते. मात्र त्यांचा पुष्पगुच्छ फडणवीसांनी स्वीकारला नाही, यावरुन महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी मोहिते-पाटलांना गद्दार म्हणत टोला लगावला आहे. दुसरीकडे शरद पवार गटाचे उमेदवार धैयर्शील मोहिते पाटलांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.

शरद पवारांनी माढ्यामध्ये फडणवीसांना धोबीपछाड दिला असला तरी फडणवीसांनीही आपला डाव टाकला आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलतबंधू काँग्रेसचे नेते धवलसिंह मोहिते पाटील यांनी रणजितसिंह निंबाळकरांना पाठिंबा दिला आहे. तसेच शरद पवारांचे निकवर्तीय विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनीही फडणवीसांची भेट घेऊन मदतीचा सूर व्यक्त केला आहे. असं असलं तरी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांचाही रणजितसिंह निंबाळकरांना विरोध असल्यानं महायुतीच्या विजयाचा रस्ता अवघड झालाय.

 Devendra Fadnavis warns Dhairyasheel Mohite Patil
Madha Lok Sabha : ३० वर्षांनंतर कट्टर विरोधक जानकर-मोहिते पाटील एकाच व्यासपीठावर; माढ्यात महायुतीला मोठा धक्का

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com